विद्यार्थांना शिक्षणासाठी करावा लागतो थेट ताडोबा जंगलातून प्रवास.. — आगार प्रमुखांचे कमालीचे दुर्लक्ष जिवघेणे ठरु नये.. — विद्यार्थ्यांच्या विरोधात आगार प्रमुख आहेत काय? — चिमूर वरून अरमान बारसागडे व जय वाघे यांचे संवेदनशील वृत्त संकलन…

 

अरमान बारसागडे 

तालुका प्रतिनिधी चिमूर..

 जय वाघे

ग्रामिण प्रतिनिधी चिमूर…

दखल न्यूज भारत.. चिमूर – तालुक्यातील मदनापुर – करबडा-विहीरगाव मार्गे शिंदेवाही धावणारी एसटी बस अद्यापही बंदच असल्याने शाळकरी विद्यार्थी व गावकऱ्यांना प्रवासासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

         सदर मार्ग ताडोबा बफर झोनमध्ये येत असल्याने या परिसरात सदैव हिंस्त्र प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो,त्यामुळे शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

         मदनापुर ग्रामपंचायतने ही अडचण लक्षात घेता सदर बस सेवा नियमित सुरू करण्याचे निवेदन एसटी महामंडळाच्या चिमूर आगर प्रमुखांना दिले आहे.

         या मार्गाची बस सेवा नियमित सुरू करण्यासाठी गावकऱ्यांनी पाच ते सहा महिन्यापासून पत्र व्यवहाराच्या माध्यमातून चिमूर आगाराची पायपीट केली आहे. 

           मात्र,या महत्वपुर्ण मागणीला थातूर मातुर कारणे समोर आणून बगल देण्याचा प्रयत्न बस आगार प्रमुखांकडून केला जात आहे. 

       याच मार्गे ताडोबा बफर झोन मधील बरेच गाव येत असून प्रवासांची नेहमीच वर्दळ असते,जंगलामध्ये बऱ्याच हिंस्त्र प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने प्रवसांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

         मुली व महिलांना प्रवासासाठी अनेक समस्या निर्माण होत आहेत,यामुळे आगर प्रमुखांनी या मार्गाची बस सेवा नियमित सुरू करावी अशी मागणी मदनापुर ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी केली आहे.

        विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व मार्गाच्या एसटी बस सेवा नियमित व सुरळित सुरू कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मदनापुर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

         याचबरोबर विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी दळणवळणातंर्गत बस सेवा सुरु न करणारे चिमूर बसस्थानक आगार प्रमुख या परिसरातील विद्यार्थ्यांचे व जनतेचे विरोधक आहेत काय?हा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे.