कोरची,कुरखेडा,तालुक्यात भारत राष्ट्र समितीच्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ..

ऋषी सहारे

संपादक

कोरची, कुरखेडा तालुक्यात दिपक दादा आञाम भारत राष्ट्र समितीचे नेते,अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा विभागीय अध्यक्ष ‌आविसं यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी तालुक्यातील मसेली,अंतरगाव,इतर ग्रामीण परिसरात चुन्नीलाल मोटघरे आरमोरी विधानसभा क्षेञ प्रमुख,तसेच ऋषि भाऊ सहारे,रुपेश बारापाञे यांचे नेतृत्वात भारत राष्ट्र समितीच्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

          याचबरोबर आरमोरी तालुक्यातील खालील गांवापासुन कुलकुली,तुलतुली,

कोसरी,नवरगाव,सालमारा,करपडा,मोहटोला,कुकडी,विहिरगांव,नरोटी चक,नरोटी माल,बोरी,देशपूर,कुरखेडा, पुराडा, कोरची बेळगाव, मशेली इत्यादी गावात भारत राष्ट्र समिती चे सभासद अभियानाला सुध्दा शुभारंभ करण्यात आले असुन पार्टी सभासद महिला सेल, किसान सभा,कार्यकाणी करण्यात आली.गावागात भारत राष्ट्र समिती पक्षाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.