एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी रोशनी शिध्दार्थ गायकवाड यांची नियुक्ती…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

               वृत्त संपादीका

           एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.श्री.पांडूरंग नरवडे व राष्ट्रीय महासचिव आ.बुधराव कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात संघटनेची बांधणी सुरू आहे.

      याच कार्याचा एक भाग म्हणून एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी रोशनी शिध्दार्थ गायकवाड यांची नियुक्ती,महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी केली आहे.

         त्यांच्या नावाची शिफारस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आ.मध्यमा मनिष सवाई यांनी केली होती.

           आ.रोशनी शिध्दार्थ गायकवाड या सामाजिक क्षेत्रातील चिरपरिचित व्यक्तीमत्व असून त्या आपल्या पदाला न्याय देतील अशी नागपूर जिल्हातंर्गत नागरिकांची अपेक्षा आहे.