पोमके धोडराज पोलीसांनी दिला मदतीचा हात…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

  गडचिरोली पोलीस दल “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातुन गडचिरोली जिल्ह्रातील जनतेचे मनोबल वाढविण्याकरीता तसेच आपल्या कर्तव्यासोबतच सामाजिक कार्याची जाण ठेवुन जनसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असुन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्रातील जनते पर्यंत विविध शासकीय योजना पोहचविण्याकरीता पोलीस अधीक्षक सा. यांचे संकल्पनेतुन राबविले जातात. याचाच एक भाग म्हणुन सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित आहेत. व नागरीकांचे नाते अधिक दृढ होण्याच्या उद्देशाने पोमके धोडराज यांनी मौजा कुरचेर येथील नामे श्री लालसु डोलु ओक्सा, वय 65 वर्ष, यांचे राहते घर अचानकपणे लागलेल्या आगीमुळे पुर्णतहा जळुन खाक झाले. त्यात त्यांचे दैनंदिन लागणारे आवश्यक राशन व जिवनावश्यक वस्तु तसेच शेती उपयोगी साहित्य व ईतर साहित्य जळाले असल्याने त्यांचा निवासाचा व उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला होता.

        सदर ईसम हा निराधार व आर्थिक दृष्ट सक्षम नसल्याचे निवासाची साधन उपलब्ध करु शकत नसल्याबाबतची माहिती मौजा कुरचेर च्या ग्रामस्थांनी दिनांक 15/04/2023 च्या ग्रामभेटीत पोउपनि सुर्यवंशी सा. यांना दिली असता पोमके धोडराज येथील प्रभारी अधिकारी यांना माहिती मिळाल्यानंतर सदर व्यक्तीला मदतीचा एक हात म्हणुन पोमके धोडराज मधील सर्व अधिकारी व अंमलदारांना माहिती देवुन मदत करण्याचे आवाहन केल्याने सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी श्री लालसु डोलु ओक्सा यांना निवासाकरीता घराचे नविन बांधकाम तयार करुन देण्यासाठी मदत केली तसेच त्यांना दैनंदिन जिवनात उपयोगात येणा-या आवश्यक राशन, जिवनाश्यक वस्तुचे व शेती उपयोगी साहित्यांचे काल दिनांक 05/05/2023 रोजी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. अपर पोलीस अधीक्षक ( प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. तसचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोमके धोडराज येथील सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी साहित्य वाटप केले. 

पोमके धोडराज येथील प्रभारी अधिकारी पोउपनि गुरव सा. व त्यांच्या टीमच्या नाविण्यपुर्ण कामाचे गावक-यांनी प्रशंसा केली.