Home Social ग्रामिण भागातील महिलांनी लघु उद्योगातून प्रगती करावी याकरिताच रोजगार निर्मीती केंद्रासाठी प्रयत्न...

ग्रामिण भागातील महिलांनी लघु उद्योगातून प्रगती करावी याकरिताच रोजगार निर्मीती केंद्रासाठी प्रयत्न :- सरपंच गजानन गुळधे… — इको विकास समिती सातारा अंतर्गत महिला रोजगार निर्मीती केंद्राचे उदघाटन संपन्न…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी.. 

चिमूर :- रोजगार निर्मीती केंद्रात पत्रावळी मशीन,शेवई मशीन,नास्ता प्लेट मशीन,या तिन्ही मशीनच्या माध्यमातून विविध प्रकारचे पत्रावळी,प्लेट,वाट्या,तयार केल्या जातील व गावातील महिलांना स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचा मनोदय सरपंच गजानन गुळधे यांनी व्यक्त केला आहे.

             

            सदर स्वयंरोजगार उपक्रम उद्घाटन प्रसंगी सातारा ग्रामपंचायत सरपंच गजानन गुळधे तथा इको विकास समिती अध्यक्ष सातारा,वनपरिक्षेत्र अधिकारी राऊत मॅडम खडसंगी,बफर वनपरिक्षेत्र अधिकारी वैद्य कोलारा,क्षेत्र सहाय्यक गुरुनुले तळोधी,कोठेवार वनरक्षक,व इतर वनविभागाचे कर्मचारी,इको विकास समिती साताराचे पदाधिकारी व ग्रामवासी उपस्थित होते.