Home देशविदेश 14 एप्रिल निमित्त आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे RSS वाल्यांना जीव की प्राण…..

14 एप्रिल निमित्त आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे RSS वाल्यांना जीव की प्राण…..

       आंबेडकरी समाजातील युवापिढीला (जी केवळ कोणत्याही आमिषापोटी कोणतेही झेंडे घ्यायला तयार होते) हाताशी धरून, त्यांना लागतील तेवढे पैसे देऊन खऱ्या आंबेडकरवादी अर्थात ” संविधानवादी ” विचार आणि आचारापासून तोडून त्यांना आपल्या कुटनीतीचे मानसिक गुलाम बनविण्याचे नवे षडयंत्र RSS /BJP/मोहन भागवत /मोदी /शहा आणि यांची पिलावळ चालवत आहेत.बरं याला बळी केवळ ही युवापिढीच नव्हे तर ,जेष्ठ नागरिक सुद्धा या षडयंत्राला अलगद बळी पडत आहेत!

याचे कारण काय?

याचे कारण एक आणि एकच…

      आम्ही (डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धाचे अनुयायी स्वतःला म्हणवून घेतो ) तथागत भगवान बुद्धाची धम्मक्रांती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानक्रांती ज्या त्यांच्या त्याग,संघर्ष आणि समर्पणातून त्यांनी केल्या.त्या क्रांत्यांना आम्ही स्वार्थत्याग,संघर्ष आणि समर्पणातून समजून न घेतल्यामुळे आचरणातून सिद्ध होऊ शकलो नाही.

       आम्ही त्या क्रांत्यांना स्मारके, पुतळे,फोटो आणि प्रतिमा निर्माण करून आंधळ्या भक्तांप्रमाणे समजून घेण्यात गेली 75 वर्षे घालवली. म्हणूनच आम्ही लाचार होऊन हजारो लाखो रुपये पगारी,निवृत्तीवेतन घेऊन सुद्धा आम्ही आमचा आंबेडकरी स्वाभिमान थोड्याबहुत पैश्यासाठी आणि अमिषापोटी कुटनीतीला विकून भटक्या कुत्र्यासारखे आम्ही लाचार होऊन बसलो!

    “नरम,गरम आणि बेशरम तोच राजकारणी”…

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर आमच्या बापाच्या वरील राजकारण्याविषयीची व्याख्याच आम्हाला आमच्या लाचारीने समजू दिली नाही.

        बदल केवळ एवढाच झाला की 1956 पूर्वी आम्हाला देवळात जायला बंदी होती.आता आम्हाला विहारात बुद्धदेव मिळाला!

        गणपतीउत्सवात मिरवणुकीत बंदी होती.आता आम्हाला 14 एप्रिल मिळाली!

बस एवढाच काय तो बदल…….

      कोणत्याही महापुरुषांची जयंती आणि स्मृतिदिन का आणि कशासाठी साजरी करावयाची असतो?

       तर केवळ आणि केवळ त्या महापुरुषाने ज्यासाठी जीवन समर्पित केले. त्यांचे राहिलेले अर्धवट कार्य आपण पूर्ण करावयाची आठवण करून तसा दृढसंकल्प करून आचरणातून सिद्ध करण्यासाठीच जयंती आणि स्मृतिदिन साजरी करावयाची असते…..

      केवळ फोटो घरात ठेऊन,प्रतिमा बाळगून,पुतळे उभारून,स्मारके सुशोभीत करून आणि वर्षातून दोनदा बेंबीच्या देठापासून बोंबलून, आणि बाकी 364 दिवस त्याच्या विरुद्ध आचरण करून जगणे म्हणजे महापुरुषांची जयंती आणि स्मृतीदिन साजरी करणे नव्हे!

     आणि हीच आमची गुलामीची मानसिकता वरील कुटनीतीला अपेक्षित होती. जिला आम्ही गेल्या 75 वर्षात निर्मिली आणि अलगद पुन्हा एकदा यांच्या जाळ्यात अडकलो.

   यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे….

     धम्म आणि संविधान या क्रांत्यांचा आचरणातुन प्रचार आणि प्रसार करून या महापुरुषांचे अनुयायी म्हणून सिद्ध होणे.

अन्य मार्ग नाहीच!

मी तर याच मार्गाने जाणार……

        कारण माझ्या शरीराच्या अणू रेणुवर केवळ आणि केवळ तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच क्रांतीचा हक्क आहे!

आपण?

         तरच RSS / मोहन भागवत / BJP / मोदी /शहा / आणि यांची पिलावळ अर्थात संविधानविरोधी शक्ती यांचे भांडवल 14 एप्रिल होणार नाही.!

जागृतीचा कृतिशील लेखक आणि आवाहनकर्ता..

       अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689…