शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
श्री रामनवमी व १४ एप्रिल या सनाच्या पार्शभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखन्यासाठी चिमूर शहरात दिनांक ५/४/२०२५ ला ६.०० वाजता चिमूर पोलीसांनी रुट मार्च काढून शांतता राखण्याचे आव्हान केले.
संध्या महाराष्ट्रात जातीय दंगल आपल्याला पहावयास मीळत आहेत त्यामूळे सायंकाळी चिमूर पोलीसांनी शहरातील मुख्य मार्गाने व गजबजलेल्या वस्तीतून रुट मार्च चे आयोजन केले.चिमूर पोलीसांनी रुट मार्चच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी चिमूर पोलीस आहेत असा विश्वास दर्शविला.
पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक मल्हारी ताळीकोटे पोलीस उपनिरीक्षक जाधव सह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.



