Home Maharashtra भारतीय जनता पार्टी च्या महिला तालूका अध्यक्षांचे ट्रॅक्टर जप्त… — वाळू...

भारतीय जनता पार्टी च्या महिला तालूका अध्यक्षांचे ट्रॅक्टर जप्त… — वाळू भरलेले ट्रॅक्टर जप्त.. — चिमूर तहसील तथा पोलीस पथकाची धडक कारवाई…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात अवैधरित्या वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी सुरु आहे.

     भाजपाच्या महिला आघाडी चिमूर तालुका अध्यक्ष मायाताई नन्नावरे यांचे वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय जप्त केले असल्याची खात्रीपूर्वक घटना पुढे आली आहे.

        चिमूर तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी फिरते पथक व स्थायी पथक तयार करून रेती चोरट्याना पकडण्याची मोहिम हाती घेतली आहे.

              दिनांक. ०४/०४/२०२५ ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची दोन ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना पकडून चिमूर तहसील ला जप्त करण्यात आले.

      हि घटना ताजी असतांनाच दुसऱ्या दिवशी दिनांक ०५/०४/२०२५ रोजी रात्रीच्या अंधारात पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय कॉलेज चिमूर येथील चौकात गस्तीवर असलेल्या चिमूर तहसील च्या स्थायी पथकाने तहसीलदार राजमाने यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील,रवींद्र चिडे मंडळ अधिकारी,शुभम बदकी तलाठी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे व त्यांच्या पाथकांनी मिळून विना नंबर रेती ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडून सदरची ट्रॅक्टर जप्त कारवाई केली.

        याची चर्चा संपूर्ण चिमूर तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात रंगली असून सत्ताधारी राजकीय पक्षाच्या महिला तालूका अध्यक्ष व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीच वाळू चोरीचा उपक्रम सुरु केला असेल तर लोकप्रतिनिधी यांचेकडून जनतेला न्याय कसाकाय मिळवून देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.