चिमूर येथे काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन… — हुकूमशाही सरकारला सत्तेतून हद्दपार करा :- विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि

चिमूर:-

गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र, काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या चिमूर येथील प्रचार कार्यालयाचे उदघाट्न व जाहीर सभा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पार पडली.

           यावेळी भाजपा सरकारला त्यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना भाजपा सरकारला सत्तेतुन हद्दपार करा असे जाहिर आवाहन केले.

           याप्रसंगी इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव गावंडे, हसन गिलानी, डॉ. सतीश वारजुरकर, ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले, सेवादल महासचिव महाराष्ट्र प्रदेश राम राऊत, माधव बिरजे, काँग्रेस अनु. जाती सेल जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, जिल्हा उपाध्यक्ष संजय डोंगरे, अॅड. गोविंद भेंडारकर, श्रीनिवास शेरकी, माजी जीप सदस्य गजाननबुटके, तालुका अध्यक्ष डॉ विजय गावंडे.डॉ. बोढे, संजय घुटके, विनोद ढाकुनकर अविनाश अगडे, राजू लोणारे, अमिर धम्मानी, किशोर शिंगरे, विवेक कापसे, सोपान खोडके, प्रशांत कोल्हे, नागेद्र चट्टे, पप्पू शेख, घनश्याम चाफले, विलास पिसे, राजू चौधरी,प्रदीप तळवेकर, विजय डाबरे, सविता चौधरी,माधुरी रेवतकर, राणी थुटे, सिमा बुटके, लता रामटेके, वैशाली पिसे, व महाविकास घटक पक्षाचे प्रमुख पिसे, नर्मदा शेंडे, भावना पिसे आघाडी व पदाधिकारी व नेते उपस्थित होते.