मनोरुग्ण युवकांनी गळफास लावून केली आत्महत्या…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

            पागलपणाचे दौरे येत असलेल्या व वेळासारखा वागत असलेल्या युवकाने स्वतःच्या बकऱ्याचे कोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली.

           पारशिवनी शहरातील प्रभाग क्रमाक १२ खारी येथील रहिवासी असलेल्या ईश्वर गिरगुसे वय ३० वर्षीय  या युवकाने सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान घरच्या बकऱ्याचे कोठ्यात पिवळ्या नायलोन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. 

          मोहल्यातील नागरिकांच्या मदतीने सदर युवकास खाली उतरविले व पोलिस स्टेशन पारशिवनी येथे सदर गळफास घटना क्रमाची माहीती दिली.

                पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच मृतक युवक ईश्वर सुरेश गिरगुसे यांचा पंचनामा करून मृतदेह उतरणीय तपासणी करिता ग्रामिण रुग्णालय येथे पाठवले. 

         मृतकचा मोठा भाऊ जगदिश सुरेश गिरगुसे राहणार प्रभाग क्रमाक १२ खारी पारशिवनी यांच्या तक्रारी नुसार,”आत्महत्त्येचे कारण पागलपणाचे दौरे येणे व वेळासारखा वागणे,नमूद करण्यात आले.

            पारशिवनी पोलिसांनी आकस्मिक मर्ग क्रमाक ८/२४ कलम जाफो १७४ अन्वये गुन्ह्याची नोंद केली असून गुन्हाचा पुढील तपास  पारशिवनी पोलिस करित आहेत.