Home Social लाखनी येथे पत्रकार दिन साजरा…

लाखनी येथे पत्रकार दिन साजरा…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

लाखनी :- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया, तालुका लाखनी यांच्या वतीने मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह, लाखनी येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याण राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.चंदन मोटघरे, शमीम आकबानी, राजू खान, श्यामसुंदर उईके, शैलेश उरकुडे, खुशाल भुरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

         कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना अध्यक्ष कल्याण राऊत यांनी पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजात सत्य, पारदर्शकता आणि लोकहितासाठी काम करत असल्याचे सांगितले. पत्रकारांनी एकजूट ठेवून निर्भीडपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

        लाखनी नगरसेवक संदीप भांडारकर यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

         कार्यक्रमास तरुण भारतचे प्रतिनिधी प्रा.अजिंक्य भांडारकर यांच्यासह मिथिलेश गिऱ्हेपूजे, तुषित गजभिये, कालिदास खोब्रागडे, अनिल शेंडे, मदन कमाने, मुकेश मेश्राम, नरेंद्र मेश्राम आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. अजिंक्य भांडारकर यांनी केले.