भाजप आळंदी शहराच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध…

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक

आळंदी : आळंदी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रभू श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल जाहीर निषेध करण्यात आला. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वत्र त्याचे पडसाद उमटले आहे.

           तिर्थक्षेत्र आळंदी येथील महाद्वार चौकात भाजपाचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध करण्यात आला. यावेळी डॉ.राम गावडे, ज्ञानेश्वर बनसोडे, चारुदत्त प्रसादे, आकाश जोशी, भागवत काटकर, संकेत वाघमारे, वासुदेव तुर्की, शंतनु पोफळे, राहुल घोलप, प्रमोद बाफना, सचिन सोळंकर, संगिता फपाळ, मीना चव्हाण आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

          यावेळी शहराध्यक्ष किरण येळवंडे म्हणाले की सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांच्या विषयी आक्षेपार्ह, वादग्रस्त वक्तव्य करत, राजकीय स्वार्थासाठी व समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जितेंद्र आव्हाडचे वक्तव्य आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध आळंदी शहर भाजपतर्फे करत आहोत.

            अखंड हिंदुस्थानाचे कोट्यावधी हिंदू समाजाचे दैवत प्रभू श्रीरामांचे येणाऱ्या २२ जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्त आनंदाचे वातावरण असतांना महाविकास आघाडीचा गरळ ओकणारा मुब्राचा जितेंद्र आव्हाड याने प्रभू श्रीरामान बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल आळंदी शहर भाजप व तमाम श्रीराम भक्त यांच्या वतीने प्रतीकात्मक पुतळा जाळत आज आम्ही जाहीर निषेध केल्याचे भाजपाचे संघटन सरचिटणीस ज्ञानेश्वर बनसोडे यांनी यावेळी सांगण्यात आले.