बहुउद्देशीय अखिल कुणबी समाज साकोली तर्फे “कोजाग्रती” कार्यक्रमाचे आयोजन…

        शेखर इसापूरे

  विभागीय प्रतिनिधी, नागपूर

           दखल न्यूज, भारत 

   साकोली – भंडारा जिल्ह्यातील तालुका साकोली येथे दि.04/11/2023 ला बहुउद्देशीय अखिल कुणबी समाज साकोलीतर्फे कोजाग्रती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे आयोजन अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष डाॅ.अजयराव तुमसरे यांच्या अध्यक्षतेखाली, बावने कुणबी समाज साकोली यांनी केले. 

          कार्यक्रमाला विशेष पाहूणे म्हणून भंडारा येथील बावणे कुणबी समाजाचे अध्यक्ष सदानंद ईलमे, के.झेड. शेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रदिप गोमासे यांनी करुन, समाज संघटित होण्याची गरज असल्याचे सांगीतले.

या कार्यक्रमात डाॅ. दिनेश कुथे अस्थिरोग तज्ञ यांनी मार्गदर्शन केले.

              सदर कार्यक्रमाला उपाध्यक्ष आशिषजी भुते, सहसचिव विकास साळवे, कोषाध्यक्ष आशिष मारवाडे , त्याप्रमाणे जेष्ठ सदस्य केशव अतकरी , सुर्यभान चेटुले , जयकृष्ण खराबे , विलास हलमारे,अमोल हलमारे, तुळशीराम मुटकुरे, सल्लागार प्रभाकर सपाटे, राघव ईसापुरे कायदेविषयक सल्लागार अॅड. दिलीप कातोरे, महिला अध्यक्ष श्वेता भुते, महिला सचिव प्रियंका हलमारे तसेच साकोली तालुक्यातील असंख्य समाज बांधवांनी हजेरी लावली होती.

कार्यक्रमात लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडून बक्षीस वितरण करण्यात आले. 

       अध्यक्षीय मार्गदर्शनात डाॅ.अजय तुमसरे यांनी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकाश टाकला.सूत्रसंचालन विलास हलमारे यांनी केले.आभार प्रदर्शन केशव अतकरी यांनी केले.