दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी भाजप नेते राम गावडे यांच्या आळंदी येथील निवासस्थानी भेट दिली. या भेटीत स्थानिक विकासकामे, पक्ष संघटनात्मक घडामोडी तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
मंत्री चंद्रकांत पाटील हे आळंदी शहरात कार्यक्रमांसाठी दौऱ्यावर आले असताना त्यांनी गावडे कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी आळंदी शहर व ग्रामीण मडलचे कार्यकर्ते, नागरिक व युवा कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मंत्री पाटील यांनी गावडे यांच्या सामाजिक आणि जनसंपर्क कार्याची दखल घेत त्यांचे कौतुक केले.
राम गावडे यांनी शहर व ग्रामीण मधील पायाभूत सुविधा, रस्ते व वाहतूक व्यवस्थेवरील काही महत्त्वाचे प्रस्ताव मंत्री पाटील यांच्यासमोर मांडले. यावर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “शहराच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवू,” असे आश्वासन दिले.
या भेटीप्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या भेटीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ही भेट आळंदी शहरातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे.



