आरमोरी डोंगरी येथे चर्चासत्र सभागृहाचे आ.गजबे यांचे हस्ते भूमिपूजन…

 

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी:

     परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत परमात्मा एक सेवक शाखा आरमोरीच्या चर्चासत्र सभागृहाचे भूमिपूजन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते आरमोरी डोंगरी येथे नुकतेच पार पडले.

   यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला आरमोरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, भाजपा तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, महिला भाजपा तालुकाध्यक्ष डाँ.संगीता रेवतकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, पत्रकार रुपेश गजपुरे, नगरसेवक मिथुन मडावी, नगरसेविका निर्मला किरमे, अक्षय हेमके, परमात्मा एक सेवक शाखा आरमोरीचे मार्गदर्शक सुधीर भोयर, अनिल किरमे, मीनाक्षी भोयर, नीता चोपळे, परशुराम चोपळे, आनंदराव गंडाटे, शामराव दुमाने, अशोक जवंजालकर, मारुती दुमाने, गोपाल हजारे, कृष्णा सोनकुसरे, विलास मडावी, दीपक भोयर, भारत कुंमरे, देवराव बांनबले, संतोष माकडे ,दीपक बाणबले, सुभाष उपरीकर, लूकेश बावणे, देविदास लठे तसेच सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.