अंधश्रद्धा निर्मुलन समितीची जनसंवाद यात्रा ७ ला गडचिरोलीत. 

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली _ महाराष्ट्र अंधश्रध्दा निमुर्लन समितीची जादुटोणा विरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा दि. ७ सप्टेंबर २०२3 ला गडचिरोली जिल्ह्यात येत असुन महाराष्ट्र नरबळी,अमानूष,अनिष्ठ व अधोरी प्रथा,बुवाबाजी,प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ अर्थात जादुटोणा कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रेत संवाद व मार्गदर्शन लाभणार आहे. 

          सदर कार्यक्रम शिवाजी सायन्स महाविदयालय,विध्याभारती हायस्कूल कॉमलेक्स व एस.पी. ऑफीस कार्यालय गडचिरोली येथे प्रत्यक्ष प्रात्याक्षीक व मार्गदर्शन करून सदर यात्रा कोटगुल जाणार आहे.

           कार्यक्रमात राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे व इतर मान्यवराचे मार्गदर्शन लाभणार आहे.

            सोबतच काही गावात व जंगलात काही साधू ‘ बुवा,ढोंगी बाबा जंतर मंतर करतात व भोळ्याभाबळ्या लोकांची फसवणूक करतात.अशा व्यक्तीचा सुद्धा भंडाफोड करण्यात येणार आहे.अशी माहीती अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे समन्वयक प्रा.मुनिश्वर बोरकर,सरोज मॅडम यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

           सोबतच राज्य कार्यकारणी सदस्य नंदिनी जाधव,सम्राट हटकर आदिचे मार्गदर्शन लाभणार आहे.