ग्रामदेवता बहिरंगेश्वर व श्रीराम मंदिर कामाचे भूमिपूजन माझ्यासाठी भाग्याचे… — खा. सुनील मेंढे याचे प्रतिपादन…..

प्रितम जनबंधु

संपादक 

भंडारा :- एकीकडे अयोध्येचे प्रभू श्रीरामाचे मंदिर पूर्णत्वास जात असताना, भंडाऱ्यातील राम मंदिर निर्मितीचा जुळून आलेला योग म्हणजे योगायोग आहे. माझ्या हाताने होत असलेल्या भूमिपूजनासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. परिसराचे सौंदर्यीकरण आणि राम मंदिर सभागृहाची निर्मिती वेळेत आणि गतीने होईल असा विश्वास खा सुनील मेंढे यांनी दिला.

        भंडाऱ्याची ग्रामदेवता असलेल्या भगवान बहिरंगेश्वर मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण आणि राम मंदिराच्या सभागृह व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन खा सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदारांच्या पुढाकारातून या दोन्ही कामांसाठी 1 कोटी 78 लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी खासदार सुनील मेंढे बोलत होते. साधु संत, देव देवता हा आमच्या धर्माचा आधार आहे, तिथे आमची श्रद्धा आहे. आमची संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम याच ठिकाणाहून होते. 

        राम मंदिराच्या सभागृह भूमीपूजनाचा योग म्हणजे माझ्यासाठी भाग्याचा आहे. अयोध्या राम मंदिरासाठी जी कारसेवा झाली. त्यात माझा सहभाग होता. एकीकडे अयोध्येचे राम मंदिर पूर्णत्वास जात असताना, भंडा-यात राम मंदिराच्या सभागृह निर्मितीचा झालेला मुहूर्त माझ्यासाठी तेवढाच अभिमानाचा विषय असल्याचे तसेच हे मंदिर उभारण्यासाठी प्रत्येक राम भक्ताचा हात लागावा म्हणून प्रत्येकाने दातृत्व दाखवावे असे ते म्हणाले. यावेळी खासदारांनी स्वतःकडून राम मंदिराच्या निर्मितीसाठी 1लाख 1 रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली. 

          व्यासपीठावर यावेळी श्री बहिरंगेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद सारडा, सचिव मधुकर चेपे, गोविंद जी काबरा, प्रकाश पिंपळापूरे, रमेश पांडे, अशोक निमकर, विहींपचे संजय एकापूरे, रामदास शहारे, डॉ. उल्हास फडके, उपस्थित होते. यावेळी खासदारांच्या हस्ते विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात आले. पौरोहित्य गणेश चेपे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. देवस्थान समितीच्या पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.