Home Social शंकरपुर आरोग्य केंद्रात बेडची संख्या वाढविण्याबरोबरच इतर समस्यांची सोडवणूक करण्यासाठी चंद्रपूर जि.प.मुख्य...

शंकरपुर आरोग्य केंद्रात बेडची संख्या वाढविण्याबरोबरच इतर समस्यांची सोडवणूक करण्यासाठी चंद्रपूर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना,”उपसरपंच अशोक चौधरी यांनी दिले निवेदन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

     चिमूर तालुकातंर्गत येत असलेल्या मौजा शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात बेडची व्यवस्था पुरेशी नसल्याने रुग्णांची व नागरिकांची गैरसोय होत आहे.याचबरोबर इतर सोई सुविधा पासून रुग्ण वंचित राहात असल्याबाबतचे निवेदन शंकरपुर येथील उपसरपंच अशोक चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

       मौजा शंकरपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून,त्यामधे ३४ गांवांचा (खेळे) समावेश आहे.दररोज ओ.पी.डी. रुग्ण संख्या ३०० च्या जवळपास आहे.परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या सोई सुविधा नागरिकांना मिळायला हव्या त्या पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याचे निवेदनात नमूद आहे.

         आरोग्य केंद्रातील समस्यांचा पाढा वाचतांना आरोग्य केंद्रात नेहमीच ओषधांचा तुटवडा असतो,प्राथमिक केंद्रात पाहिजे त्या प्रमाणात स्टाप उपलब्ध नाही,नर्स व इतर कर्मचारी यांची कमतरता असल्यामुळे ते पाहिजे त्या प्रमाणात रुग्णांना सेवा देवू शकत नाही असे निवेदनाद्वारे लक्षात आणून दिले आहे. 

         तद्वतच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्येच घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गांवांमध्ये वेगवेगळे आजार होत आहे,त्यामध्ये लहान मुलांचा समावेश अधिक प्रमाणात असल्याचे वास्तव सुध्दा निवेदनातून सिईओ यांच्या पुढे ठेवले आहे.

       शंकरपूर आरोग्य केंद्रात जवळपासच्या संपूर्ण गावांचे नागरिक हे उपचार घेण्याकरिता येत असतात.परंतु त्याच आरोग्य केंद्रात नेह‌मी ओषधांचा तुटवडा असतो,ही बाब अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे.याचबरोबर कर्मचा-याची कमतरता यामुळे रुग्णांना वेळेवर सेवा देता येत नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याबाबतचा उल्लेख सुध्दा निवेदनात आहे.

      निवेदनाच्या प्रती श्री.अशोक उईके पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा (म.रा.), श्री.प्रकाश आबिटकर मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग (म.रा.), श्री जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा शल्यचिकित्सक सार्वजनीक आरोग्य विभाग चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहेत.