Home Maharashtra छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान… — लाभ घेण्याचे तहसीलदार आरमोरी यांचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान… — लाभ घेण्याचे तहसीलदार आरमोरी यांचे आवाहन…

ऋषी सहारे

  संपादक

आरमोरी :- महसुल विभागामार्फत राज्यात दिनांक 01 ऑगष्ट 2025 रोजी महसुल दिन व दिनांक 01 ते 07 ऑगष्ट 2025 या कालावधीत महसुल सप्ताह 2025 साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाचे निर्देश असून सदर महसूल सप्ताहादरम्यान तालुक्यात दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

        त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 04 ऑगष्ट 2025 रोजी तालुक्यातील महसुल मंडळ कार्यालय, आरमोरी, वैरागड, देऊळगाव आणि पिसेवडधा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आयोजित करण्यात येत आहेत.

        सदर अभियानामध्ये आधार कार्ड, संजय गांधी योजना, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, घरकुल, शेतकऱ्यांना आवश्यक असलेले विविध दाखले, ॲग्रीस्टॅक, जिवंत 7/12 मोहिम व शैक्षणिक प्रवेशाकरीता आवश्यक असलेले दाखले, आरोग्य तपासणी शिबीर इ.विविध लाभ देण्यात येणार आहेत.

        तरी सदरहू लाभ घेण्याकरीता दि.04 ऑगष्ट, 2025 रोजी वरील महसुल मंडळ स्तरावर आयोजित महाराजस्व अभियानमध्ये उपस्थित राहुन विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन तहसिलदार, आरमोरी यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.