Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… चिमूर आगाराची बस झाली पलटी… — वाहकाचा मृत्यू...

ब्रेकिंग न्यूज… चिमूर आगाराची बस झाली पलटी… — वाहकाचा मृत्यू तर १० प्रवाशी जखमी,चालक बेशुद्ध!

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

     महाराष्ट्र राज्यातंर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील एस.टी.महामडळाच्या चिमूर आगाराची बस अंदाजे २ वाजून ४५ मिनिटांनी चिमूर ते वरोरा मार्गावरील मौजा चारगाव जवळ पलटी झाल्याने वाहक सुरेश भातकर यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक सुरज पुस्नाके बेशुद्ध झाले आहेत.

         याचबरोबर १० प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वरोरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.चिमूर ते वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने होत असल्याने या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत.हेच खडे बऱ्याच वेळा अपघाताचे कारण ठरले आहे.

         मात्र,आजच्या अपघाताचे कारण पुढे आले नाही…