तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती व घोगरा महादेव ट्रस्ट, सालई ग्रांम पचायत व कालापाटा ग्राम पचायत यांची संयुक्त बैठक… — सतर्कता व सावधानते बाबत सभेत चर्चा.

 

       कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- पर्शिवानी तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती व घोगरा महादेव ट्रस्ट, सालई ग्रांम पचायत व कलाफटा ग्राम पचायत यांची संयुक्त बैठक तहसीलदार हनुमंत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक राहुल सोनवने यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. 

         सदर बैठकी मध्ये घोगरा श्री क्षेत्र महादेव परिसर व नदी परिसरामध्ये घ्यावयाची खबरदारी,उपाय योजना,सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे,गार्ड लावने,सतर्कतेबाबत व सावधानतेबाबत ठळक अक्षरात फलक लावणे संबंधाने चर्चा झाली.

          या बैठकीत घोघरा महादेव मंदिर कमेटीचे पदाधिकारी,सभासद व ग्राम पंचायत सालई व काळापाटा चे सरपंच,उपसरपंच,ग्रामपचायत सदस्य तसेच तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सभासद व तालुकाचे प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने हजर होते .