कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- चालक-मालक बहुउद्देशिय संघटनेच्या वतीने आयोजित वृक्षरोपण कार्यक्रम शहरातील नवीन बस स्टँड व हरिहर विद्यालय पारशिवनी इथे पार पडला.
या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये तहसीलदार श्री.हनुमत जगताप पारशिवनी,पोलिस निरीक्षक राहुलजी सोनवणे,खंडविकास अधिकारी श्री सुभाष जाधव पंचायत समिती,सौ अर्चना ताई भोयर जिल्हा परिषद सदस्य,सौ प्रतिभा कुंभलकर नगराध्यक्ष न.प. पारशिवनी,डॉ.प्रमोद भड अध्यक्ष तालुका वैद्यकीय आघाडी भाजपा,दिवाकररावजी भोयर सामाजिक कार्यकर्ता,शाहूजी, मोहरकर सर,श्री मोहोड सर व इतर शाळेचे शिक्षक,शिक्षिका व चालक-मालक बहुउद्देशिय संघटनेचे संपूर्ण कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थितीत होते.
नविन बसस्टॅण्ड व हरिहर विद्यालय येथे ठिक ठिकाणी विभिन्न प्रजातीचे वृक्ष लावण्यात आले.