गांधी विचार दर्शन युवा प्रेरणा शिबिराचे पुण्यात आयोजन… — महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आयोजित एकदिवसीय कार्यशाळा…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात ‘ गांधी विचार दर्शन युवा प्रेरणा शिबिर ‘ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. .रविवार, दि. ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते ५ या वेळात ही कार्यशाळा गांधी भवन, कोथरूड पुणे येथे होईल.

        या कार्यशाळेत संजय आवटे (संपादक, लोकमत पुणे),डॉ.उल्हास बापट,(कायदे तज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक),डॉ. कुमार सप्तर्षी,(अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल) हे मार्गदर्शन करतील.

कार्यशाळा प्रवेशासाठी https://forms.gle/bB752xgAv7GijQoz9 गुगल लिंक वर नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी सुदर्शन चखाले 7887630615,संदीप बर्वे,9860387827,सचिन पांडुळे 9096313022 यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.