Home देशविदेश RSS अर्थात मनुस्मृतीवर आधारित असलेली मनुवादी शक्ती म्हणजे निसर्गवादाविरोधी,मानवतावादाविरोधी,रक्तरंजित पाट वाहायला भाग...

RSS अर्थात मनुस्मृतीवर आधारित असलेली मनुवादी शक्ती म्हणजे निसर्गवादाविरोधी,मानवतावादाविरोधी,रक्तरंजित पाट वाहायला भाग पाडणारी,संविधानविरोधी शक्ती….. 

      ने शताब्दी वर्षाच्या तयारीसाठी 2014 मध्ये टाकलेला गियर, 2029 च्या लक्षाला गाठुनच विसावणार?

     आणि ” आम्ही भारताचे लोकं ” बघ्याचीच भूमिका घेणार का?

         या शक्तीने पृथ्वीतलावर प्रथम निसर्गालाच आव्हान दिले. आपल्याला ठाऊक आहे की, निसर्गाला किंवा त्याच्या तत्वज्ञानाला छेडलं की तो व्याजासहित धडा शिकवितो. अगदी तसेच झाले तथागत भगवान बुद्धाच्या बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाच्या निर्मितीच्या रूपाने प्रथमच याच RSS ला तडाखा बसला. त्यांच्या कार्यकारणभावाच्या विज्ञानवादी, निसर्गवादी, मानवतावादी सिद्धांताची निर्मिती मनुवाद्याच्या जिव्हारी लागली आणि तीला सम्राट अशोक, सम्राट कनिष्क, आणि सम्राट हर्षवर्धनाने त्या तत्वज्ञानाच्या धम्माला राजाश्रय दिल्याने या RSS वाल्यांना पळता भुई थोडी झाली होती. याचा सूड म्हणून की काय पुष्यमित्र शून्ग या सेनापतीने कपाटाने ब्रहदृथाचे राज्य उलथवून टाकून पुन्हा RSS ने बदला घेतला. त्यानंतर आपल्या देशातून बुद्ध धम्म लयास गेला.

         या पृथ्वीतलावर संपूर्ण विश्वात आजपर्यंतच्या काळात निसर्गाला कार्यकारणभावाच्या सिद्धांतानुसार डोळसपणे समजून घेऊन त्यानुसार आचरण करण्याचे आव्हान तथागत भगवान बुद्धाशिवाय कुणीही केलेले नाही!

       एवढेच काय आज 2025 च्या काळापर्यंत सुद्धा याच सिद्धांताला समजून घेण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय कोणत्याही भिखू संघाने सुद्धा प्रयत्न केले नाहीत. या सिद्धांताला प्रयोगातून सिद्ध करण्याचे काम जेंव्हा सोळाव्या शतकात वैज्ञानिकांनी केले…

         तेंव्हा हा वैज्ञानिकांचा निसर्गवादी,मानवतावादी,माणसाला सदविचारी बनवणारा ” घाव ” RSS च्या एवढा वर्मी बसला, की त्यातून ते अजूनही सावरलेले नाहीत ( म्हणूनच तर आपल्या देशात शाळा बंद करून मंदिराची निर्मिती मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि ज्या शाळा चालू आहेत त्यात हिंदू धर्माची अंधश्रद्धा शिकविणेच चालू आहे ).

        तेंव्हा जगातील अंधश्रद्धेचा काळोख नष्ट व्हायला सुरुवात झाली. परंतू ,याच विज्ञानाने निर्मिलेल्या संशोधनामुळे निर्माण झालेल्या भौतिक सुखामुळे पुन्हा हाच मानव अंधश्रद्धेच्या,दैवी संकल्पनेच्या आहारी जाऊन माणसाचा सदविचारी बनण्याचा मार्ग खुंटला.

          अशा प्रकारे, क्रांती आणि प्रतीक्रांतीच्या लाटांना या देशात सुरुवात झाली.

       पुष्यमित्र शुन्गाच्या कपटाने केलेल्या प्रतीक्रांतिनंतर साढेतेराशे वर्षांनी या देशात….

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी RSS च्या मनुस्मृतीचे 1927 मध्ये जाहीर दहन करून या प्रतीक्रांतीला पुन्हा एकदा भगवान बुद्ध आणि वैज्ञानिकानंतर क्रांतीच्या रूपाने शह दिला. हा घाव मनुवाद्यांच्या एवढा वर्मी लागला की, पुष्यमित्र शुन्गाची प्रतीक्रांती पत्त्याच्या राजवाड्याप्रमाणे कोसळली!

       पुढे याच मनुस्मृतीच्या दहनात भावी संविधान निर्मितीची बीजे पेरल्या गेली. RSS ला याची सूतराम सुद्धा कल्पना येऊ शकली नाही.आली असती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्माला सोडण्याची वेळच येऊ दिली नसती.

        परंतू निसर्गनीयतीचा खेळ काही वेगळाच असतो. हे RSS कधीच ओळखू शकली नाही, ओळखू शकणार नाही, कारण ती निसर्गवादाच्या विरुद्ध असल्यामुळे.!

       RSS ने जगात एकही आजपर्यंत वैज्ञानिक किंवा संशोधक निर्माण केलेला नाही.!

       RSS ने एकही तत्ववेत्ता किंवा महापुरुष किंवा कोणतेही तत्वज्ञान निर्माण केला नाही.!

      उलट RSS ने सर्व महापुरुष, तत्ववेत्ते,तत्वज्ञान या सर्वांना आपल्या मार्गातील स्पीडब्रेकर समजून त्यांना कपटाने बाजूला करण्याचेच काम केले. प्रसंगी बाजूला नाही झाले तर त्यांना संपवण्याचे सुद्धा काम केले.!

       उदा. अब्राहम लिंकन, जॉन एफ. केनडी, म. गांधी. मार्टिन ल्युथर किंग, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश……

          परंतू , यांच्यातून वाचलेले केवळ तथागत भगवान बुद्ध, संत कबीर आणि संत परंपरेतील इतर संत,म.फुले,सावित्रीबाई फुले,छत्रपती शिवाजी महाराज आणि छ.शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. नेल्सन मंडेला इत्यादी आपल्या देशातील व जगातील सर्वच तत्व वेत्ते आणि महापुरुष…..

       वरील सर्वच महापुरुष आणि तत्ववेत्त्यांचा जिवंतपणी आणि मृत्यूनंतर सुद्धा मात्र RSS ला धाक होता,आहे आणि कायम राहिल!

       म्हणूनच तर यांनी बहुजनांना कायम गुलाम ठेवण्यासाठी त्या त्या महापुरुष आणि तत्ववेत्त्यांचे तत्वज्ञान ग्रंथातून बाहेर येऊ न देण्यासाठी कायमचे त्यांना स्मारकात आणि पुतळ्यात दफन करण्याचे काम RSS ने केले.

       एवढी वैचारिक दहशत या तत्ववेत्ते आणि महापुरुष त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा RSS ला कायम राहिली आहे.म्हणून हा जळफळाट 2014 पासून संधी मिळाली म्हणून वेगाने व्यक्त होतो आहे!

         या RSS ने स्वतःकधी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही. 1857 चा जो इंग्रजांविरुद्ध उठाव केला, त्याचे प्रमुख कारण हेच होते की, 1818 ला इंग्रज आणि महार फलटणीने दाखवलेल्या शौर्यामुळे पेशवाई संपली. 

          आणि 1857 मध्ये सर्व इंग्रज सैन्य 45000 पंजाबमध्ये एकाच ठिकाणी जमेलेले होते. याचा फायदा उठवून ( निमित्त मात्र मुस्लिम सैनिकांच्या काडतूसाला डुकराची चरबी आणि हिंदूंच्या काडतूसाला गाईची चरबी लावली जीला तोंडाने काढावं लागायचं ) हिंदू आणि मुस्लिम यांच्यात कंसातल्या कारणावरून इंग्रजांविरुद्ध भडकऊन इंग्रजांना देशातून कायमचे हाकलून लावायचे.आणि पुन्हा पेशवाई स्थापन करायची हा मनुवाद्यांचा कावा होता.कारण भारतात इंग्रजानी प्रथम लोकशाही आणि तीच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यास शिक्षण आणि दळणवळणात क्रांती करून सुरुवात केली होती म्हणून.

         साधारणपणे पुष्यमित्र श्युंगाच्या नंतर ते म.फुले दाम्पत्य,छ.शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळापर्यंत मनुवादी अर्थात RSS ला या साढेतेराशे वर्षाच्या काळात प्रथम वरील महापुरुषांनी डायनामाइटने सुरुंग लावून उध्वस्त करून टाकले.आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन करून RSS व मनुवाद्यांचे नाक तोंड दाबून श्वास घेणे थांबवले होते..

शेवटी बावीस वर्षानंतर तर…..

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहून आणि देशाला प्रदान करून,निदान या देशात तरी मनुवाद्यांना अर्थात RSS ला कायमचे मातीत गाडले….

         परंतू या मनुवाद्यांनी अर्थात RSS नी संधी मिळताच पुन्हा डोके वर काढण्याचे काम केले. पहिले काम जेंव्हा 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान प्रदान करण्यात आले.तेंव्हाच RSS ने यात आमच्या मनुस्मृतीमधील संहिता कुठेच नाही. म्हणून 30 नोव्हेंबर 1949 रोजी चारच दिवसांनी या संविधानाला विरोध केला!

       त्यानंतर या विरोधाला कुणी जुमानत नाहीत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जिवंत प्रेतयात्रा काढली. तरी सुद्धा काही फरक पडत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी 1951 आणि पासूनच संविधानातील मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचे काम केले. परंतू तेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

        त्यानंतर 1976 साली पुन्हा एकदा बेचाळीसावी घटनादुरुस्ती करून RSS ने संविधानाच्या संरक्षणाची चौकटच काढून टाकण्याचे म्हणजे मूलभूत हक्कावर गदा आणण्याचे काम केले.

       म्हणजे जशी जशी संधी मिळेल तशी तशी RSS ( संविधान विरोधी शक्ती ) डोके वर काढण्याचा प्रयत्न करत होती. परंतू , तीला विसाव्या शतकात ती संधी कधीही मिळू शकली नाही. ती संधी मिळाली म्हणण्यापेक्षा ती चालून आली एकविसाव्या शतकात 2014 ला!

      ” एखादी पक्षीनी आपल्या पिलांसाठी तोंडात चारा घेऊन भरधाव आपल्या घरट्याकडे निघावी.वाटेत अनेक हिंस्र पक्षांनी तीला रक्तबंबाळ करून घायाळ करावे.तीने तसेच कसेतरी आपल्या घरट्यापर्यंत पोहोचावे.आणि आपल्या पिलांच्या तोंडात चारा टाकून मान टाकावी.!”– डॉ.दिनकर खाबडे…

         अशी परिस्थिती डॉ. बाबासाहेबांची आपल्या अस्पृश्य समाजासाठी होती.

       यापुढे जाऊन मी म्हणेन की अशी परिस्थिती जशी अस्पृश्य समाजाला जेवढ्या प्रमाणात लागू होते. अगदी तेवढ्याच प्रमाणात…….”

      ” आम्ही भारताचे लोक “म्हणून ही परिस्थिती संपूर्ण देशाला लागू होते. कारण एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मनुवाद्यांच्या / RSS हिंस्त्र पक्षांनी रक्तबंबाळ करून सुद्धा…….

       भारताचे संविधान निर्माण करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्हांला देऊन ” आम्ही भारताचे लोक ” म्हणून जबाबदारी टाकली आणि ते संविधान अधिनियमित आणि अंगीकृत करून स्वतःप्रत अर्पण करण्यास भाग पाडून कर्तव्यातून सिद्ध होण्यास भाग पाडण्याची शपथ देऊन मान टाकली……”

    अशी सुद्धा परिस्थिती देशासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची होती….

        प्रत्येक महापुरुष,तत्ववेत्ते आपापली क्रांती कर्तव्यातून सिद्ध करुन निघून जातात आणि अनुयायांनी ती क्रांती जतन आणि रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे एवढीच अपेक्षा ते ठेवतात. नेमकी हीच अपेक्षा RSS, मनुवाद्यांना नको असते. म्हणूनच तर त्या त्या महापुरुषांना RSS नी स्मारकात व पुतळ्यात त्यांच्या क्रांत्या बंदिस्त करून बहुजनांसाठी डोकं आपटायला आणि पुष्पहार अर्पण करायला निघाले.जे महापुरुषांना कधीच मान्य नव्हते!

          भारताच्या संविधानाच्या निर्मितीनंतर लागलीच 1951 पासूनच मूलभूत हक्कावर गदा आणण्यास मनुवाद्यांनी सुरुवात केली. म्हणजे बाळ जन्मल्याबरोबर त्याचा गळा घोटण्याचे काम RSS ने करण्यास सुरुवात केली.परंतू , बाळाचे बाप जिवंत असल्यामुळे ते शक्य झाले नाही. नंतर मात्र 1976 साली पुन्हा मूलभूत हक्कावर गदा आणण्यासाठीच बेचाळीसावी घटनादुरुस्ती केली!

        शेवटी 2014 पर्यंत मनुवाद्यांना पाहिजे तशी अनुकूल परिस्थिती मिळूच शकली नाही..

         शेवटी 2013 च्या शेवटी ( 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ) देशाचे तत्कालीन प्रसिद्ध विधिज्ञ् राम जेठामलानी यांच्याकडे मोदी / शहाची जोडी गेली. तेंव्हा मोदीवर गोध्रा हत्याकांडाचा आणि अमित शहावर सोराबुद्दीनच्या एनकोउंटरचा गुन्हा होता. या दोन्ही खटल्यातून आम्हांला वाचवा आणि भाजपाला सत्तेत आणण्यासाठी मदत करा.अशी मागणी केली. तेंव्हा ही मागणी त्यांनी मागणी केली.परंतू राम जेठमलानी यांनी एक अट टाकली की, तुमची सत्ता आल्यावर काँग्रेसनी आणि इतर चोरांनी जेवढे कांही स्विस बँकेत पैसे नेऊन ठेवले आहेत,ते सगळे पैसे तुम्ही आणून सरकारी तिजोरीत जमा करावे. ही मागणी त्यांची या जोड गोळीने मान्य केली. 

         मोदी/शहा यांनी याही पुढे जाऊन निवडणूक प्रचारात ओरडून सांगितले की, ” आमचे सरकार आले की, आम्ही स्विस बँकेतील सर्व पैसे आणून प्रत्येक कुटुंबाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकून देऊ. “

    या घोषणाला आम्ही भाळलो आणि मोदी / शहाला अर्थात भाजप आणि RSS ला सत्तेत बसवलो!

          2014 ला सत्तेत बसवल्यानंतर राम जेठमलानी यांनी आपले कर्तव्य केले. परंतू या जोडगोळीने मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. किंवा ते स्विस बँकेतून पैसे आणून ते पैसे भारताच्या तिजोरीत न भारतात RSS च्याच RBI मध्ये भरलेत की काय अशी राम जेठमलानी यांना शंका आल्यामुळे आणि लोकशाहीतील विरोधी पक्ष संपवून राज्यातील राज्य सरकारे इतर पक्ष फोडून आपले सरकार येनकेन प्रकारे आणून लोकशाही संपवण्याचा जो घाट या जोडगोळीने घातला. तेंव्हाच राम जेठमलानी यांनी भारतीय जनतेला उद्देशून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कदापि मोदी / शहाला अर्थात भाजपला निवडून देऊ नका. असे आवाहन केले होते.

           परंतू , तोपर्यंत या जोडगोळीने EVM + VVPAT च्या माध्यमातून तीला सेटिंग करून आपल्या मुख्य निवडणूक आयोगाला गुलाम बनवून आमच्या मतांचा हिरावून घेऊन पुन्हा भाजप 2019 ला सत्तेत आली. 

          2024 पर्यंत त्यांनी पुन्हा RSS च्या शताब्दीपूर्तीची तयारी जोमात सुरु केली. त्यात प्रथम त्यांनी भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याच्या दिशेने 2022 मध्ये राममंदिराचा मुद्दा कायम निकाली काढला ( सर न्यायाधीशाला आमिष देऊन ). त्यानंतर त्याच वर्षी सेंट्रल व्हिस्टाची म्हणजे आधुनिक संसदेची निर्मिती करून राष्ट्रपती ऐवजी उदघाटन गोसावड्यांच्या हस्ते केले. तिथे मोदीने लोटांगण घालून संविधानिक दर्जा घसरवला.

       त्यानंतर RSS च्या शताब्दीपूरतीसाठी भेट म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान कायमचे हटविण्यासाठी त्यापूर्वी आपले मनुवादी संविधान तयार करून…

    ” अबकी बार 400 पारचा नारा भाजपने दिला. “

       परंतू ,कदाचित निसर्गनियतीला कदाचित ते मान्य नसावे…

       म्हणून कुठल्यातरी कारणाने त्यांचे स्वप्न भंगले. परंतू , ते डगमगले नाही. त्यांनी दोन कुबड्या घेऊन सरकार बनवले. आणि EVM आणि मतदार याद्यात नकली नावे नोंदवून अर्थात मतचोऱ्या करून येन केन प्रकारे राज्यांतील विधानसभा निवडणुकीत अर्ध्यापेक्षा जास्त राज्यात आपली सरकारे असली आणि केंद्रात आपण स्वतः असलो म्हणजे संविधान हटविण्यासाठी सोपे जाईल आणि RSS चे शताब्दी वर्षे 2029 च्या निवडणुकीनंतर साजरे करता येईल असे स्वप्न भाजप,RSS, मोदी,शहा,फसनवीस रंगवत आहेत.

कारण…..

    त्यांनी आमची 2014 ला करंगळी पकडली. 2019 ला मनगट पकडले. 2024 ला त्यांनी आमचा गळा पकडला आणि 2029 ला तो जोराने दाबणार!

        यासाठी RSS ने/ मनुवाद्यांनी / भाजप, मोहन भागवत / मोदी / शहा / फसणवीस आणि यांच्यासोबत असलेल्या हतबल मित्रपक्ष या सर्वांनी मिळून स्वतःच्या लाभासाठी,RSS च्या शताब्दीपुरतीसाठी सर्व केंद्रातील आणि अनेक राज्यातील सत्ता पणाला लावून देशातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान आणि लोकशाही संपविण्याचा घाट घालून RSS ला शताब्दी निमित्त भेट देण्याचा विडा उचललेला आहे.

     वरीलप्रकारचे RSS चे,मोहन भागवतचे,मोदी,शहाचे,भाजपचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार का?

     ” आम्ही भारताचे लोक “म्हणून आम्ही जी दररोज शपथ घेतो.तीला कृतीतून सिद्ध करणार का?

     त्यासाठी आपण आपले तन,मन आणि धन सर्वस्व पणाला लावणार का?

        त्यासाठी आपल्यातील अहंकार आणि स्वार्थ बाजूला फेकून केवळ आणि केवळ निसर्गवादी,मानवतावादी,निर्जीवसृष्टीच्या साहाय्याने संपूर्ण सजीवसृष्टीचे कल्याण साधणाऱ्या,धर्माच्या कर्मकांडातून विज्ञानवादाकडे घेऊन जाणाऱ्या,स्वातंत्र्य,समानता,न्याय आणि बंधुता या मूल्यांना अविष्कारीत करणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानाला वाचविण्यासाठी या RSS आणि तीच्या पिलावळींना (संविधान विरोधी शक्तीला ) कायमचे मातीत गाडण्यासाठी प्रत्येकानी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आक्रमक प्रयत्न करण्याचा दृढसंकल्प करणार का?

मी केलाय……

तुम्ही?

टीप :- सदरील लेख जास्तीत जास्त व्हायरल करण्याचे मी आपल्या प्रत्येकाला आवाहन करत आहे. शिवाय आपल्याकडे जर वर्तमानपत्र असेल तर त्यातही प्रकाशित करण्याचे मी आवाहन करत आहे……

        आवाहनकर्ता…

           अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद,7875452689…