शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
मंगेश दादा बोबडे रील स्टार म्हणून आपल्या महाराष्ट्रात गाजणारे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिव्यवंदना आधार फाउंडेशन चिमूर जिल्हा चंद्रपूर द्वारा संचालित रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ, मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र जामगाव कोमटी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे या लोकांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.
संपूर्ण लोकांना वाढदिवसानिमित्त अन्नदान देण्यात आले. मंगेश दादा बोबडे हे भिशी वरून ५ किलोमीटरवर एक छोट्याशा जामगाव मध्ये राहत असून अतिशय गरीब कुटुंबातून शून्यातून विश्व निर्माण करणारे करणारे अशी त्यांची एक छोटीशी कथा आहे.
27 वर्षीय युवकाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर अवघ्या 24 महिन्यात आपल्या कलागुणांनी चांगली लोकप्रियता मिळवलेली आहे. ग्रामीण भाषेतील विनोदी शैलीत मंगेशने बनवलेले शॉट व्हिडिओ लोकांच्या पसंदीत उतरलेले आहेत. भिशीचा पोट्या मंग्या या नावाने मंगेशच्या instagram ला दोन लाख 40 हजार चाहते आहेत. youtube ला 15000 फॉलोवर्स मिळालेल्या फेसबुकला ४०००० आहेत. अशी लोकप्रियता मंगेश दादा बोबडे यांनी मिळवलेली आहेत.
तुम्ही एकदा तरी दिव्यवंदना आधार फाउंडेशन ला नक्की भेट द्या अशी आव्हान मंगेश बोबडे यांनी केलेल्या कार्यक्रमाला अनेक मित्रमंडळी सहभागी झाले. बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार,अनाथ मनोरुग्णां सोबत वाढदिवस साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलविले आहेत.



