एल.आय.सी‌.पॉलीसीची मुदत संपल्यावर रक्कम मिळते कमी… — पॉलीसी धारकाची तक्रार,संबंधितांकडून उत्तर नाही… — अन्यथा न्यायप्रविष्ट प्रकरण?

 

युवराज डोंगरे/खल्लार

एल.आय.सी.पॉलीसीची मुदत संपल्यावर ग्राहकांनी भरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळत असल्याचे प्रकरणे पुढे आली आहेत.

          मुदत पूर्ण पाॅलीसी अंतर्गत रक्कम कमी का मिळते? याबाबत एल.आय.सी.ग्राहकाने संबंधित शाखेकडे तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही.

        तसेच माहीतीचा अधिकार टाकूनही एक महिना संपल्यावर सुध्दा माहीतीच्या अधिकाराचे उत्तरही एल.आय.सी शाखेने दिले नसल्याने ग्राहक न्यायालयात दाद मागणार आहे.

         खल्लार नजिकच्या नालवाडा येथील डॉ प्रकाश चिंचोळकर यांनी दि 28/4/08 ला एल आय सी ची 15 वर्ष मुदतीची जिवन सरल ही पॉलीसी काढली होती.सदर ग्राहकाने 15 वर्ष नियमितपणे एलआयसी ची 90 हजार रक्कम भरली.

      मुदत संपल्यावर डॉ प्रकाश चिंचोळकर यांना 1,18,718 रुपये मिळायला पाहिजे होते.मात्र तेवढी रक्कम न मिळता त्यांना 15 वर्षा नंतर बेसिक रक्कम 54,700 व बोनस 28,718 असे एकुण 83,418 रुपये मिळालेत.

         15 वर्ष 90 हजार रुपये भरायचे व मुदत संपल्यावर 83 हजार 418 रुपयेच कसे मिळतात? मग बाकीची रक्कम कुठे वळविण्यात आली? किंवा का म्हणून देण्यात येत नाही?असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

       याबाबत माहिती मागितली असता अचलपूर शाखेच्या अधिकाऱ्यांनी माहितीच दिली नाही.माहितीचा अधिकार टाकला असता एक जास्त होऊनही माहितीच्या अधिकाराखाली माहिती दिली नाही.

      या सर्व प्रकारचा एलआयसी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खुलासा करावा,अन्यथा याबाबत न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा डॉ प्रकाश चिंचोळकर यांनी दिला आहे.