ऋषी सहारे
संपादक
आरमोरी:-
यंदाच्या वर्ग दहावी च्या निकालात सरस्वती माध्यमिक विद्यालय पळसगावने उतुंग भरारी घेतली. दरवर्षीप्रमाणे यंदाही एस.एस.सी. २०२३ चा निकाल १००% टक्के लागला. एकूण विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीमध्ये तर 24 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. सरस्वती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाने दहावी तसेच बारावीच्या निकालामध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. याबद्दल इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर भातकुलकर, सचिव अंताराम ढोंगे, सहसचिव केशवराव कुंभारे व संचालिका स्वाती भाकुलकर व प्राचार्य हेमंत बोरकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विद्यालयात, मुख्याध्यापक, प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सत्कार केला. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय पालक व शिक्षकांना दिले. परिसरात सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केल्या जात आहे तसेच गुणवंत विद्यार्थी या माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयातून नेहमीच बाहेर पडतील अशी प्राचार्यांनी ग्वाही दिली.