राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात निरोप समारंभ…! — विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आपापले मनोगत..

रमेश बामणकर 

तालुका प्रतिनिधी 

अहेरी:- येथील स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात बीएससी अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप द्वितीय वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. यावेळी निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य. डॉ. एम के मंडल व प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेश हलामी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेचे अधिकारी प्रा. तानाजी मोरे, केमिस्ट्री विभाग प्रमुख प्रा. श्यामल बिस्वास व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

      कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना माला अर्पण तसेच दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी स्थान ग्रहण करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात समोर वाटचाली बद्दल संवाद साधण्यात आले आहे यावर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्रवास व समोरील जीवनासाठी प्रयत्नरत असल्याचे आशिष सुनतकर, जॉर्ज मोसेस, अनुष्का ओंडरे, साहिल कोसरे व इतरांनी मत व्यक्त केला आहे. 

      सन 2021-22 च्या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेत आवर्जून भाग घेऊन योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे तसेच शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेट देऊन सन्मान करण्यात आले आहे. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मोरे तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी कशिष शेख यांनी केला आहे. यावेळी बीएससी भाग 1 व 2 वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप दिला आहे तसेच सर्वांच्या सहकार्याने निरोप समारंभ योग्य पद्धतीने पार पडले आहे.