सर्व विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश.

ऋषी सहारे 

संपादक

 

राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांतील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थिनींना शासन मोफत गणवेश, बूट आणि साहित्य देत होते. 

मात्र यावर्षीपासून खुल्या गटातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शासकीय शाळांचा गणवेश एकाच स्वरुपाचा करावा लागणार आहे, असे शिक्षण मंडळाने म्हटले गेले आहे.

राज्य सरकारने पुढाकार घेतल्याने आता शांळांना पैसे द्यावे लागणार नाहीत. याआधी शासन पैसे वाटप करायचेआणि शाळा व्यवस्थापन समित्या, संस्था यांच्या स्तरावर कापड खरेदी करुन विद्यार्थ्यांना गणवेश दिले जात होते.

 मात्र, अद्याप हा निधी शाळांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे यावर्षी राज्य सरकारच गणवेश वाटप करणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.