वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालाचा विद्यापीठात नवीन विक्रम…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

           साकोली:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ द्वारा आयोजित क्रीडा स्पर्धामध्ये वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथील बी. पी. एड द्वितीय वर्षाचा विद्यार्थी दिनेश पुत्र महेंद्र सिंग याने बांबू उडी मध्ये ४ मीटर उंची ओलांडून विद्यापीठात नवीन विक्रम नोंदवला.

             १९९३ मध्ये जयकुमार क्षीरसागर याचा जुना विक्रम ३.४० मीटर चा होता. तो विक्रम मोडून आता दिनेश ने नवीन प्रतिमा स्थापित केली. संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर व संस्थाध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी विद्यार्थ्याचे तसेच महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

            या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी, प्रा. डॉ. सुनील कापगते, प्रा. डॉ. सुनील अकोलनेरकर, प्रा. अजय कांबळे, प्रा. डॉ. राजश्री, प्रा. नीरज अतकरी यांना दिले. या प्रसंगी पुकराज लांजेवार, देवेंद्र इसापुरे, शाहीद सय्यद, दिव्या कुंभारे व महाविद्यालयाच्या सर्व कर्मचार्यांनी शुभेच्छा दिल्या.