गोसिखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना तात्काळ पुरवठा करावे तथा बारमाही चालुच ठेवावे:- शुभम मंडपे यांची मागणी.. — चिमुर उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.. 

      रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

         रब्बी हंगामाची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी चना, गहुची पेरणी केली आहे.अशातच पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सदर मालाला पाणी द्यायचे कुठून असा शेतकऱ्यां समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

        अशातच गोसिखुर्द प्रकल्पातंर्गत कालव्यांचे चिमुर तालुक्याच्या काही भागापर्यंत काम झाले आहे.म्हणून शेकऱ्यांची अडचणी लक्षात घेता वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व आंबोली ग्रा.प. सदस्य शुभम मंडपे यांनी गोसिखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांसाठी बारमाही चालु करावे अशी मागणी चिमुर उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

          शेतकऱ्यांना किमान 12 तास दिवसा विजपुरवठा करण्यात यावा.तसेच सोयाबीन उत्पादन सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मदत जमा करावी याची मागणी केली आहे.

       यावेळी निवेदन देतांना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व आंबोली ग्रा.प. सदस्य शुभम मंडपे,एड.सोंडवले,जिल्हा सल्लागार कांबळे सर,एड.नागदेवते सर,शहर अध्यक्ष शालिक थुल,महिला उपाध्यक्षा शीतल सोरदे,वासुदेव गायकवाड,संदीप शंभरकर,निखिल रामटेके,आशिष बोरकर,अस्मित रामटेके,ऋषिकेश मोटघरे,तथागत रामटेके,विनोद येसाबरे,प्रवीण गजभिये,साहिल पठाण,किशोर जांभुळकर, भागवत बोरकर आदी पदाधिकारी उपस्तित होते.