केरडी येथे गुरू पौर्णिमा निमिताने गुरु पुजन समारोह थाटात साजरी.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी : – जय बजरंग व्यायाम शाळा केरडी व्दारे विधिवत पुजा अर्चना करून जिवनात आई, वडीला प्रमाणेच गुरू चे अत्यंत महत्व असल्याने व्यायाम शाळेच्या खेडाळुनी गुरू पुजा करून गुरू पौर्णिमा थाटात साजरी केली. 

          सोमवार (दि.३) जुलै ला सकाळी जय बजरंग व्यायाम शाळा केरडी येथे व्यायाम मंडळाचे अध्यक्ष मा. दयारामजी भोयर यांच्या अध्यक्षेत मा. पांडूरंगजी काठोके यांचे हस्ते व्यायाम शाळा व श्री हनुमान मंदी रात विधिवत पुजा अर्चना करून कार्यक्रमाची सुरूवा त करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरानी मनुष्य जिवनात आई, वडीला प्रमाणेच गुरू चे अत्यंत महत्व असल्याचे संबोधुन सर्वानी सत्याच्या मार्गाने चालल्या स चांगले यश प्राप्त करता येते असे मौलिक मार्गदर्शन केले. व्यायाम शाळेतील खेडाळुनी आपल्या अखाड याच्या गुरूला नमन व पुजा करून आशिर्वाद घेतला .यावेळी कार्यक्रमास देवाजी भोयर, प्रविण शेलारे, गणपत ठाकरे, रामभाऊ हिवसे, राजु वानखेडे, शंकर फलके, समिर, यश शेंडे, अमित खंडार, वसंता भोंगाडे, किसना हिवसे, विलास ठाकरे, रवि, वैभव भोयर, हितेश भोयर सह मान्यवर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.