नवेगाव खैरी येथिल राष्ट्रीय आदर्श विद्यालयात प्राथमिक आरोग्य केन्द तर्फे सिकलसेल तपासणी शिबिर..

 प्रतिनिधी: नवेगाव खैरी,पारशिवनी  

       राष्ट्रीय सिकलसेल अनिमिया निर्मूलन अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी व राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी यांचे संयुक्त विद्यमाने सोल्यूबिलीटी चाचणी (सिकलसेल तपासणी) करण्यात आली. या तपासणीचा ४१ विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घेतला.

      याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बेबी काझी (एलएमव्ही), मनीष वाघमारे (एमपीडब्ल्यू), वंदना वघारे (एचएलएल.लॅब) आशा सेविका ममता गजभिये, छबी राऊत यांनी तपासणी कार्य केले.

       यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राजीव तांदुळकर, साक्षोधन कडबे, नीलकंठ पचारे, दिलीप पवार, प्रा. अरविंद दुनेदार, प्रशांत पोकळे, सतीश जुननकर, अमित मेश्राम, सौ. तारा दलाल, सौ. अर्चना येरखेडे, प्रा. मोहना वाघ, शालेय कर्मचारी मोरेश्वर दुनेदार, रशीद शेख, लिलाधर तांदूळकर, गोविंदा कोठेकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे समस्त कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.