ऋषी सहारे
संपादक
देसाईगंज:
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त देसाईगंज शहरामधील ‘शिवराज्याभिषेक सोहळा उत्सव समिती’ व शिवभक्तांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा “हिंदू साम्राज्य दिन” निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक ही हनुमान मंदिर, पोलीस स्टेशन ते हनुमान मंदिर, कस्तुरबा वॉर्ड वडसा अशी काढण्यात आली.
या मिरवणुकीमध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे हे सहभागी होऊन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मोतीलाल कुकरेजा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, विजय ठकराणी, शामराव शेंडे, डाबरे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.