डॉ. आंबेडकर विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

ऋषी सहारे

संपादक

      आरमोरी येथील डॉ. आंबेडकर विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच १० वी आणि १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा पार पडला.

       या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेरणा शिक्षण संस्थेचे मदन मेश्राम संस्थापक अध्यक्ष हे होते. प्रमुख अतिथी, प्राचार्य व्ही. जी. शेंडे, पर्यवेक्षक नैताम, बडोले उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व रोख रक्कम देउन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन मेश्राम संस्थापक यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात शिक्षकांनी आपले अध्यापनाचे कार्य विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी प्रामाणिकपणाने अध्यापन करुन विद्यार्थ्यांची प्रगती उतरोत्तर वाढवावी शाळेला यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी ध्येय निचित करुन प्रामाणिकपणाने कठीण परिश्रम करुन उज्वल यश संपादन करावे असा मौलिक उपदेश केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचे संमोचित भाषणे झाली.

       एच. एस. सी च्या परिक्षेत शाळेतुन प्रथम कु. अस्मिता बाबुराव वनकर ७२.८३ व्दीतीय कल्याणी रामेश्वर कपुरडेहरीया ६२.८३ तृतीय लकी मनिराम रामटेके ६२.६७ टक्के तर एस. एस. सी परिक्षेमध्ये प्रथम निकेतन वसंत आढाव ९२.६० टक्के, व्दितीय मंगेश महेंद्र चौधरी ९२.४० टक्के तर तृतीय दिशांती विजय उंदीरवाडे ९० टक्के, पुजा मोरेश्वर बांबोळे ९० टक्के, संस्कार बंडु कात्रोजवार ८८ टक्के, तनमय वसंत कामडी ८६.८० टक्के, श्रेयश राजु रामटेके ८६ टक्के, श्रुती विलास गिरडकर ८५.२० टक्के, स्नेहा केशव बगमारे ८५.२० टक्के, चैतन्य कैलाश गेडाम ८५.२० टक्के,

        कार्यक्रमाचे प्रास्तविक केशव बांबोळे, संचालन प्रविण खोब्रागडे आभार प्रदर्शन शेखर निमजे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिलवंत वासनिक, सुशिल सोमनकर प्रफुल दामपल्लीवार सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.