Home Social जि.प.शाळा शिगंणापूर (मुले)कडून शिला आठवले यांचा सत्कार…

जि.प.शाळा शिगंणापूर (मुले)कडून शिला आठवले यांचा सत्कार…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

 नुकत्याच शिक्षण विभागात शिक्षकांच्या पदोन्नती झाल्या त्यामध्ये जि.प.पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिगंणापूर (मुले) च्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका शिला गोपाळराव आठवले ( सौ जामनिक ) यांची शिक्षण विस्तार अधिकारी 2 म्हणून पदोन्नती झाल्या बद्दल त्यांचा नुकताच जि. प. शाळा शिगंणापूर (मुले )कडून तसेच शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत शिंगणापूर असे संयुक्त विद्यामाने उभयतांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

         प्रथम पाहुण्यांचे हस्ते विद्येचे आराध्य दैवत माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या नंतर मान्यवरांचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

         कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पानझाडे, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सविताताई सोळंके, उपसरपंच जिवन बेलसरे, पोलिस पाटील राहुल बावनेर, ग्रामपंचायत सदस्य जयश्री भटकर, सुनिता बावनेर, उंबरकर, रेखा इंगळे, तसेच सर्व सदस्यगण,केंद्रप्रमुख राजेंद्र मालोकार, व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मोनिका चव्हाण, सदस्य पूजा बावनेर, राजेंद्र बनसोड, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र कडू,सुरेश कचवा, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीकृष्ण इंगळे, राठी , उच्च श्रेणी मुख्याध्यापक मुख्याध्यापिका ललिता फुटाणे, विषय शिक्षक अब्दुल शहजाद , सहाशिक्षिका लता कडू, मनिषा अवघड संगिता टोपे,प्रशिक्षणार्थी रविकिरण बनसोड, जिल्हा परिषद शाळा शिगंणापूर कन्या च्या संध्या सदानशिव, सारिका पवित्रकार, तथा पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

         शेवटी नव्याने पदोन्नती झालेल्या शिला आठवले शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या वतीने सर्व विध्यार्थ्यांना व सर्व मान्यवरांना स्नेह भोजन देण्यात आले.