रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेची महत्त्वपूर्ण बैठक 4 फेब्रुवारीला..

 

अमरावती /प्रतिनिधी 

     रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले च्या वतीने दि.४ फेब्रुवारी 2004 रविवारला शासकीय विश्रामगृह चपराशी पुरा कॅम्प येथे दुपारी तीन वाजता पक्षाचे वरिष्ठ नेते महेंद्र भाऊ भालेकर,प्रकाशभाऊ बनसोड, स्थायी समिती माजी सभापती महानगरपालिका अमरावती ओम प्रकाशभाऊ बनसोड,जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

           या बैठकीमध्ये पक्षाचे सदस्य नोंदणी बुकांचे वितरण करण्यात येणार असून तसेच पक्षाची बांधणी आणि विविध विषयावर विचार विमर्श करण्यात येणार आहे.तरी पार्टीच्या जिल्हा व शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष ओम प्रकाश बनसोड शहराध्यक्ष मनोहर घोडेस्वार यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे.