मुकेश पाण्डेय यांची राष्ट्रीय पंच म्हणुन निवड…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

        दिनांक १६ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत झुंझुणू, राजस्थान येथे अखिल भारतीय आंतर विद्यपीठ ग्रापलींग स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातील विविध विद्यापीठ आपापल्या विभागांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

          या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याकडून चंद्रपूर येथील स्थानिक निवासी मुकेश भिमसेन पाण्डेय (कुस्ती NIS कोच) यांची नियुक्ती पंच म्हणुन करण्यात आली आहे. या राष्ट्रीय पातळीवर आपल्या शहराचे उत्कृष्ट पंच मुकेश भिमसेन पाण्डेय हे हरियाणा, पंजाब, राजस्थान , गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा नामांकित राज्यांच्या पंचांच्या चमुसोबत राहुन महत्वाची भूमिका पार पडणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या ग्रापालिंग फेडरेशन ऑफ इंडिया व ग्रापालिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून मुकेश पांडेय यांची पंच म्हणुन निवड करण्यात आली हे विशेष. 

             या कौतुकासाठी ग्रापलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संतोष देशमुख, तांत्रिक सचिव संदिप बोरसे, नारायण वाघाळे- नागपुर, ओम देशमुख – नागपुर, जनार्दन कुसराम – गोंदिया, अमित मेश्राम – गडचिरोली, महावीर वारहरे – वर्धा, चंद्रपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश पंधरे, भूषण देशमुख, सुमित शुक्ला, शार्विल देवारकर, विनोद द्विवेदी, अनिल ठाकुर, इम्रान पठाण, मनोज बंडेवार यांनी या कामगिरी व नियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या व समोर झुंझुनु, राजस्थान येथे होणाऱ्या ग्रपलिंग स्पोर्ट्स अखिल भारतीय विद्यपीठांच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.