शाळेत अवतरल्या सावित्री..

   अबोदनगो चव्हाण

तालुका प्रतिनिधी चिखलदरा

दखल न्यूज भारत..

चिखलदरा:-

         स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थिनींनी सावित्रीचे रूप धारण करत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.

         एक जानेवारी 1948 रोजी पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कार घेऊन सुरू केली होती. स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून फुले दांपत्याचा गौरवाने सन्मान स्त्री शक्ती करत असते. 

          विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सावित्रीबाई फुले यांना आज आदरांजली अर्पण करण्यात आली. प्राथमिक शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारत त्यांच्या विचाराने शिक्षण घेण्याचा संकल्प आज केला. 

         अलवीणा अबोदनगो चव्हाण या विद्यार्थिनीने थोर समाजसुधार सावित्रीबाई फुले यांची हुबेहूब वेशभुषा सकारली असता सर्वाचे लक्ष वेधले.