दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने कार्यरत असलेल्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या शेठ कांतीलाल नंदराम चोरडिया सांस्कृतिक सभागृहात संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, “संस्थेची सर्वांगीण प्रगती हेच आमचे ध्येय असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत संस्थेचे सात विश्वस्त बिनविरोध निवडले गेले. यात सुरेश धनराज वडगांवकर, अजित सुरेश वडगांवकर, डॉ.ज्ञानेश्वर श्रीधर पाटील, पांडुरंग चंद्रकांत कुऱ्हाडे, प्रकाश देवराम काळे, लक्ष्मण गुलाबराव घुंडरे आणि योगेंद्र गोपाळराव कुऱ्हाडे या सदस्यांचा समावेश आहे.
सभासदांनी आम्हाला एकमताने निवडून दिल्याबद्दल सर्व विश्वस्तांनी सभासदांचे आभार मानले. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याने एकत्रितपणे कार्य करू, असा निर्धार या वेळी विश्वस्तांनी व्यक्त केला.



