ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सभा दिनांक ०९ जुलै २०२५ (बुधवार) रोजी दुपारी ०१.०० वाजता गोंडवाना कला दालन, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार दिनांक १३.०६.२०२५ ते १२.०६.२०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत.
या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या आरक्षण सोडत सभेत गडचिरोली तालुक्यातील एकूण ५१ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांचे आरक्षण ठरविले जाणार आहे. यामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रातील ३४ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण तसेच अनुसूचित क्षेत्रातील १७ ग्रामपंचायतींसाठी महिला सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.
सदर आरक्षण सोडत सभा पारदर्शकतेने व नियमानुसार पार पाडण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी केले आहे.


