Home Social भंडारा जिल्हा गुणगौरव सोहळा व जनरल सभा मोठ्या उत्साहात संपन्न…

भंडारा जिल्हा गुणगौरव सोहळा व जनरल सभा मोठ्या उत्साहात संपन्न…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

साकोली : अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज, दक्षिण पीठ,नानिजधाम, जिल्हा -रत्नागिरी( महाराष्ट्र), यजमान भंडारा जिल्ह्याच्या वतीने दिनांक १ जून २०२५ रविवारला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात भंडारा जिल्हा गुणगौरव सोहळा व जनरल सभा, स्थळ -गजानन महाराज देवस्थान, सेऺदूरवाफा, साकोली,तालुका- साकोली ,जिल्हा- भंडारा या ठिकाणी स्वरूप संप्रदाय भक्त सेवा मंडळ जिल्हा भंडारा यांच्या वतीने पार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

       या गुणगौरव सोहळयात संस्थांमार्फत आर्थिक वर्ष २०२४ -२०२५ या आर्थिक वर्षात श्री संप्रदायातील पदाधिकारी, युवा युवती, संग्राम सैनिक, महीला बघीनी,भक्तगण व कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिली त्यांचा शिल्ड,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गुलदस्ता देऊन गुणगौरव करण्यात आला.

        या सोहळ्यात जगदगुरूश्री नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान च्या वतीने संपूर्ण भारतात राष्ट्रीय महामार्गावर 53 ॲम्बुलन्स अपघातग्रस्तांच्या मोफत सेवेकरिता अविरत कार्यरत आहेत. त्यापैकी भंडारा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग नंबर ६ वर कारधा येथे उभी असलेली ॲम्बुलन्स अपघात ग्रस्त रुग्णाकरिता मोफत सेवा देत आहे. त्या रुग्णवाहिकच्या टोल फ्री नंबर 88 88 26 30 30 व चालक मोहतुरे यांच्या नंबर 8799917389 हा आहे.

      अपघात झाला असता वरील मोबाईल नंबर वर फोन केला असता कमी अवधीत रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहचून त्या रुग्णांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवून विनामुल्य सेवा देत आहे.

         आतापर्यंत तीनशेच्या वर लोकांचे प्राण या ॲम्बुलन्स रुग्णवाहिकेमुळे वाचलेले आहेत. ही अमूल्य सेवा या ठिकाणी सुरू आहे.या कार्यक्रमात या रुग्णवाहिकेचे चालक प्रमोद मोहतुरे यांचे त्यांच्या सेवेबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला.

       यावेळी राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत ट्राफिक पोलीस व त्यांचे अधिकारी यांनी रुग्णवाहिके बद्दल आपले मनोगत व्यक्त करण्या करीता आवर्जून हजर झाले होते. त्यांनी या रुग्णवाहिकेचे महत्त्व पण समजून सांगितले व प्रशंसा पण केली. 

      यावेळी रुग्णवाहिकेचे टोल फ्री मोबाईल नंबरचे फलक पण लाखनी ते शहापुर या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी लावण्यात आले. 

       या कार्यक्रमाच्या अध्यक्ष र-थानी पूर्व विदर्भ पिठाचे प्रमुख राजेंद्रजी भोयर, पूर्व विदर्भ पिठाचे व्यवस्थापक प्रवीणजी परब लाभले होते. श्री कथेचे प्रमुख दिलीप गायकवाड, पुर्व विदर्भ पीठ निरीक्षक वैशाली चतुर, पुर्व विदर्भ पीठ कमेटी सदस्या पुष्पाताई दळवी,पिठ संजीवनी प्रमुख खोपडे साहेब, पीठ ॲम्बुलन्स प्रमुख जगदीश फालक साहेब, गोंदिया निरीक्षक नवरंग मेश्राम, भंडारा जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे, भंडारा जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष वर्षाताई फंदे, बालाघाट निरीक्षक दीपक साठवणे, नाणिजधाम ऑडिटर मनोहर फंदे, भंडारा जिल्हा आध्यात्मिक प्रमुख मनोज तऱ्हेकर,भंडारा जिल्ह्याचे भंडारा जिल्हा कर्नल श्रीधर वैद्य,भंडारा जिल्हा ब्लड इन नीड प्रमुख प्रशांत कुंजेकर, भंडारा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गोपाल माकडे, साकोली तालुका अध्यक्ष के.डी लांजेवार, भंडारा जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख स्नेहाताई पोटभरे, भंडारा जिल्हा तंत्रज्ञान प्रमुख निकिता ठवकर, भंडारा जिल्हा संजीवनी प्रमुख प्रियंका भुरे, भंडारा जिल्हा सामाजिक प्रमुख अशोक मोटघरे तसेच भंडारा जिल्ह्यातील जिल्हा समितीचे सर्व सदस्य,भंडारा जिल्ह्यातील भंडारा, साकोली,लाखनी, मोहाडी ,लाखांदूर ,पवनी, तुमसर सातही तालुक्यातील तालुका अध्यक्ष व महिला अध्यक्ष, तालुका कार्यवाहक, तालुका पदाधिकारी,सेवाकेंद्राचे पदाधिकारी,संग्राम सैनिक ,धाम यात्री ,युवा ,युवती महिला व पुरुष ,भक्तगण, आजी-माजी पदाधिकारी या कार्यक्रमाला हजर होते.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भंडारा जिल्हा सचिव होमराजजी वनवे, प्रास्ताविक भंडारा जिल्हाध्यक्ष नितेशजी वंजारी व कार्यक्रमाची सांगता भंडारा जिल्हा युवा अध्यक्ष आशिष दादा बालपांडे यांनी पार पाडले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

        या कार्यक्रमाला मुंबई व नागपूर वरून आलेले पिठाचे अध्यक्ष राजेंद्रजी भोयर साहेब व प्रवीण साहेब यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. सर्वांना सायंकाळी कार्यक्रम संपल्या महाप्रसाद देण्यात आला व माऊलीची सांगता आरती करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

        यावेळी सर्व भंडारा जिल्ह्यातील मागील वर्षी चांगले कार्य केलेले धर्मक्षेत्र प्रसारक, संजीवनी प्रसारक यांच्या सत्कार करण्यात आला. पुढील आर्थिक वर्ष २०२५-२०२६ या वर्षात विविध क्षेत्रात विविध सेवेच्या माध्यमातून काय काय कार्य करायचे नियोजन पण या जनरल सभेत करण्यात आले.