दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडींच्या अलंकापुरीनगरीत उत्साहात मिरवणूक पार पडली. यंदाची बैलजोडीची सेवा आळंदीतील अर्जुन घुंडरे, सचिन घुंडरे, विवेक घुंडरे, जनार्दन घुंडरे यांच्या घराण्याला मिळाला आहे. बैलजोडी मिरवणूक महाद्वारात आल्यानंतर नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या हस्ते बैलजोडीची पुजा करण्यात आली.
आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी सुद्धा विधिवत पूजन केले. घुंडरे कुटुंबीयांनी चार खिलारी बैलजोडी विकत घेतली आहे दरवर्षीप्रमाणे आळंदीकरांकडून मानाच्या बैलजोडीची सवाद्य मिरवणूक काढली जाते. गोपाळपुरातील स्वामींच्या मठाजवळ गांधी कुटुंबीयांनी बैलजोडीचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील ॲड.रोहीणी पवार, ज्ञानेश्वर वीर, बबनराव कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, विलासराव घुंडरे, रामचंद्र भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, संजय घुंडरे, अशोक कांबळे, अजित वडगावकर, सागर भोसले, योगीराज कुऱ्हाडे, सुनील रानवडे उपस्थित होते.
बैलजोडी मानकऱ्यांना देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद दिला. मिरवणुकीसाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी आळंदी वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले



