इथे गुरू म्हणजे धर्मगुरू आणि बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी बापाच्या भूमिकेतून संविधान साकारले.
गुरूचा कायदा म्हणजे धर्मग्रंथ आणि बापाचा कायदा म्हणजे सन संविधान असे गृहीत धरून हा लेख लिहिला आहे.
जसे आपला देश भारतीय राज्यघटनेच्या कायद्यानुसार चालतो,तसेच प्रत्येकाच्या धर्मग्रंथानुसार म्हणजे धर्माच्या कायद्यानुसार पण चालतो.प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ आहेत आणि त्याचे पालन त्या त्या धर्माचे लोक करतात.जसे की,आर्यांचा वैदिक ब्राम्हणधर्म आणि त्या धर्माचा धर्मग्रंथ म्हणजे वेद, हिंदूंचा हिंदुधर्म आणि त्यांचा धर्मग्रंथ म्हणजे मनुस्मृती आणि गीता,मुसलमानांचा धर्म म्हणजे इस्लामधर्म आणि त्याचा धर्मग्रंथ म्हणजे कुराण,ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबल, शिखांचा गुरूग्रंथसाहिब, अर्थात हे धर्मग्रंथ म्हणजे त्या त्या धर्माच्या माणसांचे संविधान म्हणजे कायदाच होय.त्याचे पालन म्हणजे कायद्याचे पालन होय.
संविधान आणि धर्मग्रंथ यातील फरक हा की,संविधान हे बापानी आपल्या सर्वमुलासाठी सारखेच कायदे असलेला ग्रंथ होय,आणि धर्मग्रंथ म्हणजे असे एक कायद्याचे पवित्रपुस्तक की,ज्या बापाने ( ईश्वराने ) आपल्या साऱ्याच मुलासाठी एकच कायदा आणि एकच धर्मग्रंथ न लिहिता अनेक ग्रंथ आणि वेगवेगळे कायदे केले,सारीच माणसे त्याचेच मुले असूनही या मुलानी अनेक धर्म आणि धर्माचे कप्पे करून हे सर्व भाऊ अलग अलग झाले,स्वतःचे अलग अलग कुटुंब तयार केले,जसे की,हिंदू मुस्लिम, इसाई,शीख,जैन,यहुदी इत्यादी हे समाजकप्पे किंवा अलग अलग कुटुंबे,आणि या प्रत्येक समाजकप्प्याचा कुटुंबाचा अलग कायदा, नियम,आचार संहिता.
ज्या त्या कायद्यांची अंमलबजावणी साठी धर्मगुरू निर्माण करण्यात आले.जे ईश्वर आणि व्यक्ती यांच्यातील मध्यस्त म्हणून काम करतो,कुणालाही डायरेक्ट देवाकडे जाता येत नाही,तर यांचे मार्फतच जावे लागते,हा मुख्य कायदा ज्याचे सर्वच जण पालन करतात,कारण ईश्वराकडे जाण्याचा ,मोक्षप्राप्तीचा,स्वर्गाचा रस्ता म्हणजेच धर्म आणि धर्माचा ठेकेदार म्हणजे धर्मगुरू.यांचे परवानगी घेतल्याशिवाय ईश्वर मिळणे शक्यच नाही,हा धर्माचा कायदा.पण त्याआधी शिष्यत्व पत्करावे लागते,शिष्य म्हणजे बुद्धी नसलेला मानवप्राणी.” गुरुमहराज सांगतील तो कायदा.” असे मानणारा.तो कायदा किंवा त्याचा उपदेश खरा की खोटा? हे तपासण्याचा अधिकारी शिष्यास नसतो.” बाबा वाक्यम प्रमाणं” म्हणून तो शिरसावंद्य मानायचा असतो,हा धर्मग्रंथातील कायदा.शिवाय. धर्मग्रंथ हे माणसांनीच लिहिले असूनही ते देवाने लिहिले असे धर्मगुरू सांगतो म्हणून त्याचेच खरे मानायचे असते,हा मानवी मूर्खपणा.शिष्यगण करीत असतात.कारण सर्वच शिष्य ( मग कुणीही धर्माचे असो.) हे आंधळे असतात.ते धर्माची, धर्मग्रंथ चि चिकित्सा करत नाहीत,धर्माच्या कायद्यांची तपासणी करण्याची त्यांची मानसिकता नसते.कारण ते गुरूंचे शिष्य आणि धर्माचे गुलाम असतात.गुलामाला बुद्धी मन असूनही त्याची मानसिकता गुलामीत आनंद सुख घेण्याची मानसिक तयारी असते,म्हणून त्रास होत असला तरी गुलाम तो त्रास सहन करीत असतो.सत्य असत्य,चूक बरोबर,योग्य अयोग्य ,अशी निवड किंवा पृथःकरण पाखडून करायची त्याची क्षमताच क्षीण झालेली असते.म्हणून गुरुशिष्याचे नाते हे वरदान नसून शाप ठरते.
बाप मुलाचे नाते असे मालक आणि गुलामीचे नसते. मुले ही बापाचे असत्य चूक अन्यायी वागणे असेल,चुकीच्या रूढी परंपरांचे असेल तर त्याविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य मुलांमध्ये असते, बाप मुलांच्या नात्यात स्वातंत्र्य समता मैत्री प्रेम दया क्षमा न्याय ही मानवी मूल्य असतात,जी गुरुशिष्याच्या नात्यात नसतात.कारण धर्म ही संकल्पनाच ताठर कठोर आभासी निर्दयी अन्यायी भेदभाव करणारी,चुकीचे मार्गदर्शन करणारी,ईश्वर स्वर्ग मोक्ष या अशा काल्पनिक गोष्टी सांगणारी आहे.म्हणूनच जागतिक कीर्तीचा विचारवंत कार्ल मार्क्स ने धर्माला अफूची गोळी,म्हणजे गुंगी आणणारे औषध म्हटले आहे,जे की वाचूही देत नाही आणि मरूही देत नाही.गुरूचा हा कायदा असा आहे.आणि बापाचा कायदा मात्र संविधानाची चिकित्सा करण्याची परवानगी देते,तुमचे भले वाईट काय ते तुम्हीच ठरवा,तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी ,विवेकवादी,मानवतावादी,समतावादी , विज्ञानवादी बना,असे बापाचा कायदा सांगतो.
गुरूचा कायदा स्वप्नाळू आहे,आभासी आहे,कारण तो स्वर्ग मोक्षाची लालुच दाखवतो,की जे अस्तित्वातच नाही.याचा अर्थ जे नाही त्याला आहे म्हणण्याचे म्हणजेच खोटे बोलण्याचे शिकवतो.आणि जिवंत असताना आनंद सुख शांती नको तर केल्यानंतरच ते स्वर्गात गेले तरच मिळते,असे गुरूचा कायदा सांगतो.ते सुख मिळण्यासाठी तपश्चर्या,अनुष्ठान,जपमाळ,तीर्थाटन,कर्मकांड इत्यादी वेळ पैसा श्रम वाया घालणाऱ्या गोष्टी हा गुरूचा कायदा करायला लावतो.बापाचा कायदा हा श्रम वेळ पैसा वाया न घालता या अमूल्य गोष्टींचा उपयोग आपली भौतिक आणि मानसिक उन्नती आणि प्रगती करण्यासाठी सांगतो.हा मूलभूत फरक गुरूंच्या आणि बापाच्या कायद्यात आहे.
गुरूचे कायदे सारे विषमतेचे कायदे होत.या कायद्याने विषमतावादी व्यवस्था निर्माण होते,असलेली अजून मजबूत होते,आणि बापाचे कायदे हे समाजवादी,साऱ्या मुलांना समान न्याय देणारे आहेत,म्हणून बापाच्या कायद्याने समतावादी समाज आणि व्यवस्था निर्माण होत असतो.
गुरूचे कायदे अद्यान मान्यता देतात तर बापाचे कायदे स द न्या नि बनवतात.
गुरूचे कायदे हे मेल्यानंतरच्या माणसासाठी आहेत,तर बापाचे कायदे जे जिवंत माणसासाठी आहेत.” याच देही,याच समयी,याच डोळा मी पहिला आनंदाचा सोहळा” असे स्वप्न पाहणारा हा बापाचा कायदा आहे.कोणत्याही मुलाचा बाप आपली मुले सारख्याच प्रमाणात सुखी आनंदी समाधानी शांतीमय जीवन जगावे म्हणून अहोरात्र झटत असतो.आयुष्याचे रान करून , अनेक कायदे नियम ,योजना बनवित असतो.गुरु मात्र काहीच धडपड परिश्रम न करता धर्मग्रंथ हे देवाने बनविले,हे सारे देवाचे कायदे,त्याची मी फक्त काटेकोरपणे अंमलबजावणी करतो,आणि तेही शिष्यांकडून पाया पडून घेऊन, दक्षिणा घेऊन काहीच कष्ट परिश्रम न घेता,आयतेच खाऊन,असे हे गुरूचे आचरण.विचार केल्या नंतर कळेल की,ईश्वर आणि भक्त यात गुरू शिष्याची गरजच काय ? नाहीच.पण स्वार्थी ऐतखाऊ व्यक्तींनी पुरोहितशाही निर्माण करून सारा सत्यानाश केला या समाजाचा.एकसंघ समाजाचे अनेक जाती धर्मात तुकडे तुकडे करून त्यांच्यात भांडणे लावली.आणि त्यावर आपली पोळी भाजली.



