Home देशविदेश कायदा : गुरूचा आणि बापाचा…. — लेख क्रमांक ०१…

कायदा : गुरूचा आणि बापाचा…. — लेख क्रमांक ०१…

      गुरू म्हणजे शिक्षक नव्हे की मार्गदर्शक किंवा सहकारी पण नव्हे.गुरू हा शब्द धार्मिक आहे प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ म्हणजे त्या धर्माचे कायद्याचे पुस्तकच असते.ते धर्माचे कायदे लोकांना सांगणे,त्यांची अंमलबजावणी करणे,हे गुरूचे काम असते.

        देशाचे जसे संविधान असते,तसेच धर्मग्रंथ म्हणजे धर्माचे संविधान च होय.शेकडो वर्षापासून धर्माचे कायदे पाळत आल्याने तशी मानसिकता आणि सवय लोकांना झालेली आहे,ते कायदे चुकीचे आता वाटायला लागले तरी बदलणे कठीण जाते.

      गुरूचे कायदे म्हणजे धर्माचे कायदे,नियम,संस्कृती,आचरण आणि बापाचे कायदे म्हणजे सामाजिक राजकीय कौटोंबिक आणि नैतिक असतात.आपल्या मुलांचा समाजाशी सत्तेशी कुटुंबाशी संबंध येतो,म्हणून यांचे नियम कायदे आणि त्या संबंधीची नैतिकता बाप मुलांना शिकवत असतो,सांगतो.राजकीय सामाजिक आर्थिक व्यवस्था ही न्यायपूर्ण असावी अशी रास्त अपेक्षा कोणताही बाप आपल्या मुलासाठी करतोच.

       तसेच प्रत्येक क्षेत्रात माझ्या मुलास समान संधी आणि समान न्याय मिळावा,माझ्या मुलांना आपल्यातील क्षमता वृध्दिंगत करणे,कौशल्य,कलागुण यांची वाढ करण्याचे स्वातंत्र्य मिळावे असे बापाला वाटते.बापाचे हे मन विचार जाणून घेणारा बापाचा बाप म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

      बाबा म्हणजेच बाप होय.या बापाने आपल्या मुलात भेदभाव केला नाही.सगळ्यांसाठी सारखाच कायदा केला,दुर्बल मुलाकडे जसे आईबाप विशेष लक्ष देतार्त तसे विशेष लक्ष म्हणजे आरक्षण दिले.आणि धार्मिक नव्हे तर राजकीय समाजीक आर्थिक संविधान निर्मिले आणि आपल्या साऱ्या मुलांना सारखाच न्याय दिला.भेदभाव केला नाही.

       परंतु धार्मिक गुरु आणि त्यांचे ग्रंथ म्हणजे कायदे इतर धर्माची तुलना करणे,त्यात दोष पाहणे,त्यांना कमी लेखणे व स्वतःस श्रेष्ठ समजण्याचे कायदे आणि मार्गदर्शन शिक्षण दिले,भेदभाव केला ,म्हणूनच आजची धार्मिक परिस्थिती बिघडली आहे.दोन धर्मात तुंबळ युद्ध होताहेत,लाखो निष्पाप लोकांचा बळी जात आहे.याचे कारण गुरूचे कायदे अपरिवर्तनीय आहेत.

     हा फरक गुरूंच्या कायद्यात आणि बापाच्या कायद्यातील आहे.

      लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड..