पक्षाध्यक्ष पद सोडण्यासंबंधाने शरद पवार यांचे सुतोवाच… — अन् सारे स्तब्ध!

 

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

        मुंबई येथील वार.बि.सेंटर मध्ये,”लोक माझा सांगाती,या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा निमित्ताने मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडण्याचे सुतोवाच सोडले अन् क्षणात उपस्थित सर्व पक्ष पदाधिकारी,आजीमाजी मंत्री,आमदार,कार्यकर्तागण स्तब्ध झाले.

        शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.तद्वतच ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी कृषिमंत्री आहेत.

        भारतीय राजकारणातील ते अनुभवी व मुरब्बी नेते असल्याचे अनेक घडामोडी वरुन पुढे आले आहे. 

        पक्षाचे अध्यक्ष पद सोडणार असे शरद पवार यांनी स्पष्ट करताच महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंती पाटील यांना अश्रू अनावर आले तर माजी समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी पदस्पर्श करीत पद न सोडण्याची विनंती केली.

        याच बरोबर पक्षाचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते व माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या सह पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष पद न सोडण्यासंबंधाने त्यांना विनंती केली.मात्र सध्यास्थित त्यांनी चूप राहणे पसंत केले.