निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
इंदापूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हा बँक संचालक व आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शना खाली,, पॅनल प्रमुख कांतिलाल शिवाजी झगडे व भाऊसाहेब तुकाराम सपकळ यांचे शेतकरी विकास पॅनलने १४ पैकी १४ जागा जिंकुन दणदणीत विजय मिळविला.
त्यामुळे इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समीतीवर आप्पासाहेब जगदाळे गटाची एकहाती सत्ता आली आसुन या बाबतची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जे.पी.गावडे यांनी दीली.
शनिवार दि.२९ रोजी सकाळी ९ वाजता इंदापूर येथील शिक्षक सभागृहामधे मतमोजणीला सुरूवात झाली.दुपारी दीड वाजता कृषि पतसंस्था सर्वसाधारण गटातील ७ जागांची मतमोजणी पुर्ण झाली.यामध्ये आप्पासाहेब जगदाळे गटाने ७ ही जागा जिंकुन बाजी मारली.त्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व १४ जागांची मतमोजणी पुर्ण होऊन निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सर्व जागांचा निकाल जाहीर केला.यामध्ये आप्पासाहेब जगदाळे गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले.या प्रसंगी विजयी उमेदवारांच्या स्वागतासाठी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित राहुन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे १) कृषि पतसंस्था सर्वसाधारण गट. संग्रामसिंह दत्तात्रय निंबाळकर,रोहीत वसंत मोहळकर,दत्तात्रय सखाराम फडतरे,विलास सर्जेराव माने,आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे,संदिप चित्तरंजन पाटील,मनोहर महिपती ढुके,तुषार देवराज जाधव विजयी झाले.२) कृषि पतसंस्था इतर मागासवर्ग गटातुन तुषार देवराज जाधव ३) कृषि पतसंस्था महिला प्रतिनिधी गट रपाली संतोष वाबळे,मंगल गणेशकुमार झगडे ४)कृषि पतसंस्था विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातुन आबा गणपत देवकाते, ५) ग्रामपंचायत सर्वसाधारण गट मधकर विठोबा भरणे, संतोष नामदेव गायकवाड आणि ६) ग्रामपंचायतआर्थिक दुर्बल घटक गटातुन आणाल बबन बागल हे १४ उमेदवार विजयी झाले.तर ४ जागी उमेदवार बिनविरोध निवडुन आल्याने आप्पासाहेब जगदाळे गटाने सर्व १८ जागा जिंकुन इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे.