Home देशविदेश प्रलंबित मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर करणार रिपब्लिकन सेनेचे चिमूर तालुका अध्यक्ष...

प्रलंबित मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर करणार रिपब्लिकन सेनेचे चिमूर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम आत्मदहन…. — प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवले पत्र…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

     गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी आगामी २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला येथे आत्मदहन करणार असल्याच्या इशारा दिला आहे. 

         या आंदोलनात सावरी ग्रामपंचायतीचे सरपंच देखील सहभागी होणार असल्याने प्रशासकीय गोटात खळबळ उडाली आहे.

      मौजा सरडपार या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा,यासाठी गेल्या दशकापासून लढा सुरू आहे.धक्कादायक बाब म्हणजे,गेल्या १० वर्षांपासून हे गाव कोणत्याही ग्रामपंचायतीला कायदेशीररीत्या जोडले गेलेले नाही. 

        या अन्यायाचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी गेल्या १० वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान सुध्दा केले नाही.हे लोकतंत्र आणि घटनेचे उल्लंघन केले आहे.

        लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊनही जर न्याय मिळत नसेल,तर मतदान तरी कोणासाठी करायचे?’ असा संतप्त सवाल मेश्राम यांनी उपस्थित केला आहे.

रस्त्यांचा प्रश्नही ऐरणीवर….

      केवळ ग्रामपंचायतीचा प्रश्नच नाही,तर परिसरातील दळणवळणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे.मौजा सावरी ते बोथली,मौजा सावरी ते खापरी

या दोन महत्त्वाच्या रस्त्यांना अद्याप रस्ता क्रमांक मिळालेला नाही,पर्यायाने या रस्त्यांच्या कामांना मंजुरी रखडली आहे.हे रस्ते झाल्यास परिसरातील ग्रामस्थांच्या प्रवासाचा प्रश्न सुटू शकतो.मात्र वारंवार पाठपुरावा करूनही शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जगदीश मेश्राम यांनी केला आहे.

     लोकशाही मार्गाने लढा देताना रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी स्पष्ट केले की,अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाने केवळ आश्वासने दिली आहेत.त्यामुळे आता २६ जानेवारी २०२६ रोजी,म्हणजेच प्रजासत्ताक दिनी,देशाची राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

        विशेष म्हणजे,या आंदोलनाला लोकनाथ रामटेके सावरी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनीही पाठिंबा दर्शवला असून ते स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

         “सरडपार गावावर होत असलेला अन्याय आता सहन करण्यापलीकडे गेला आहे.जोपर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत मिळत नाही आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही.शासनाने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल,असेही जगदीश मेश्राम यांचे म्हणणे आहे.

       दिनांक २९/१२/२०२५ रोजी देशाचे प्रधानमंत्री यांना स्पिड पोस्ट द्वारे पत्र सादर करण्यात आले आहे.येत्या २६ जानेवारी पर्यंत या दोन्ही मागण्या पूर्ण कराव्यात आणि मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीतर आपण आंदोलनास परवानगी देत असल्याचे समजुन आंदोलन उभारण्यात येणार..

         त्यामुळे आता हा ईशारा नसुन आता हक्काची लढाई आहे असा समज जगदीश मेश्राम यांनी दिला आहे.

        या इशाऱ्यानंतर शासन आणि प्रशासन खडबडून जागे होणार का,की हे आंदोलन दिल्लीपर्यंत धडकणार,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.