उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक…
महाराष्ट्र राज्यात दिनांक ०२ डिसेंबर २०२५,रोज मंगळवारला नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूकातंर्गत मतदान होणार आहे.सदर निवडणूका शांततेत पार पाडणे मतदारांचे,उमेदवारांचे,पक्ष नेत्यांचे-कार्यकर्त्यांचे,मंत्र्यांचे आद्य कर्तव्य आहे.
याचबरोबर नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका पारदर्शक,निष्पक्ष व भितीमुक्त वातावरणात पार पाडणे ही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांची व महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव,राज्याच्या पोलिस महासंचालक,महसूल आयुक्त,पोलिस आयुक्त,निवडणूक निर्णय अधिकारी,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक यांची आहे..
बऱ्याच कालावधीनंतर नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका होत असल्याने इच्छुक उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत.
सर्व उमेदवारांनी निवडून येण्यासाठी सर्थीचे प्रयत्न केले आहेत.पण,मतदारांच्या सकारात्मक भूमिकांवर,विचारांवर,व सहकार्यावर उमेदवारांचा विजय अवलंबून असणार आहे.
आज गुप्त पद्धतीचा प्रचार असल्याने व उद्या मताधिकार बजावण्याचा दिवस असल्याने उमेदवार हे निश्चित व्यस्त आहेत.
पण,मत प्रक्रिया शांततेत व भितीमुक्त वातावरणात पार पडली पाहिजे यासाठी राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे,सतर्क झाली आहे.याचबरोबर निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आढावा घेत आहेत.
मतदारांचा कल कुणाकडे असणार हे ३ डिसेंबरला कळेल.पण,विजयाचा कल हा आपल्याकडे असावा यासाठी पक्ष उमेदवार,त्यांचे मार्गदर्शक नेते,आमदार,मंत्री,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार हे मतदारांवर नजरा ठेवून आहेत.



