राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी..
कुरखेडा : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे.
धान कापणीच्या तोंडावर झालेल्या या पावसामुळे शेतातील उभे पीक व काढणीस आलेले धान भिजून नुकसानग्रस्त झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी कुरखेडा तालुक्यातील मौजा येंगलखेडा गावाला भेट देऊन प्रत्यक्ष धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान,धानाच्या कडपा कुजल्यामुळे झालेले आर्थिक नुकसान याबाबत माहिती दिली व सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या.
तसेच त्यांनी असेही सांगितले की, “फक्त येंगलखेडाच नाही तर संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांमध्ये ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे,त्या सर्व ठिकाणी त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी.”
आमदार मसराम यांनी प्रशासनासोबत चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की,”आपण सगळ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत.शासन दरबारी मी स्वतः आवाज उठवून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देईन.”
या पाहणी दौऱ्यात उपस्थित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी,विलास बन्सोड,कमलेश बारस्कर,इंदूरकर सर,सरपंच सदानंद हलामी,संतोष पुराम,विजय साखरे,अंबरशाह पारसे,दामोधर वाट्टी,नीलकंठ कोकोडे,आसाराम हलामी,तुकाराम मारगाये,बाळकृष्ण पुराम,मंजुळा मारगाये,विश्वनाथ चन्ने,किशोर राणे,लालाजी वट्टी,राजकुमार बावनथडे,राजेश आलाम,सुधाकर किरणापुरे,अशोक लोणारे,स्थानिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी,हीच आमदार रामदास मसराम यांची शासनाकडे मागणी आहे.


